कोळसा मंत्रालय

भारताचे कोळसा उत्पादन 6.13% ने वाढून जानेवारी 2022 मध्ये 7 कोटी 96 लाख टनांवर पोचले


कंपन्यांच्या मालकीच्या कोळसा खाणींनी उत्पादनात 45 टक्के वाढ नोंदवली

कोळशावर आधारित उर्जा निर्मिती जानेवारीत 9.2 टक्केंनी वाढली

Posted On: 14 FEB 2022 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2022

भारताचे कोळसा उत्पादन 6.13% ने वाढून जानेवारी 2022 मध्ये 7 कोटी 96 लाख टनांवर पोचले आहे. जानेवारी 2020 मध्ये ते 7 कोटी 50 लाख टन होते. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या तात्पुरत्या माहितीवरून यावर्षी जानेवारीत झालेल्या एकूण कोळसा उत्पादनापैकी, कोल इंडिया लिमिटेडने (CIL)  कोळसा उत्पादनात 2.35% वाढ करत  6 कोटी 45 लाख टन कोळसा उत्पादन केले आहे.  सिंगरेनि कोलेरीज लिमिटेडने   (SCCL) 6 कोटी 3 लाख टन कोळसा उत्पादन घेत उत्पादनात 5.42% ची वाढ नोंदवली आहे. या कालावधीत कंपन्यांच्या मालकीच्या खाणींनी कोळसा उत्पादनात 44.91% एवढी वाढ नोंदवत 9 कोटी 7 लाख  टन कोळसा उत्पादन नोंदवले.

सर्वात महत्वाच्या 35 कोळसा खाणींपैकी 14 कोळसा खाणींनी 100 टकक्यांहून अधिक चांगली कामगिरी केली आणि इतर सहा खाणींनीही 80 ते 100 टक्के कामगिरी बजावली.

जानेवारी 2020च्या तुलनेत जानेवारी 2022 मध्ये उर्जासंबधित कामांसाठी पाठवलेल्या कोळशाचे प्रमाण 18.70% नी वाढून  63.22 MT वर पोचले. जानेवारी 2020मध्ये ते 5 कोटी 32 लाख 60 हजार टन होते.

जानेवारी 2020 च्या तुलनेत कोळशावर आधारित उर्जा निर्मितीने 9.21%ची वाढ नोंदवली. जानेवारी 2022 मध्ये एकूण उर्जा उत्पादन जानेवारी 2020 च्या तुलनेत 6.69% हून अधिक होते.

कोविड महामारीमुळे आर्थिक वर्ष 2021 हे असाधारण वर्ष मानले असल्यामुळे आर्थिक वर्ष 2022 मधील कोळसा उत्पादनाची तुलना आर्थिक वर्ष 2020 मधील कोळसा उत्पादनाशी करण्यात आली आहे.

 

  S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1798305) Visitor Counter : 401