वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचा (अपेडा) 36 वा स्थापना दिन साजरा
कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण(अपेडा) च्या माध्यमातून कृषी आणि प्रक्रिया युक्त खाद्यपदार्थांची निर्यात 2000-2001 मधील 9 अब्ज डॉलर्स वरून वाढून 2020-21 मध्ये 20.67 डॉलर्स झाली
Posted On:
13 FEB 2022 5:08PM by PIB Mumbai
कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) आज आपला 36 वा स्थापना दिन साजरा केला. या प्राधिकरणाची 1986 मध्ये स्थापना झाली तेव्हा कृषी उत्पादन निर्यात 0.6 अब्ज डॉलर्स इतकी होती. 2020-21 मध्ये कृषी उत्पादनांची निर्यात 20.67 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी प्राधिकरणाने सरकारला सक्रिय सहकार्य केले. प्राधिकरणाने 205 देशांमध्ये निर्यात विस्तारण्यास देखील मदत केली.
अपेडाचा निर्यातीचा वाटा (20.67 अब्ज डॉलर्स) 2020-21 मध्ये एकूण कृषी उत्पादनांच्या निर्यातीच्या 49% होता, त्यामध्ये कडधान्ये आणि ताजी फळे आणि भाज्या 59%, तृणधान्ये आणि विविध प्रक्रियायुक्त वस्तू 23% आणि प्राणीजन्य उत्पादनांचा 18% वाटा आहे.
अपेडाला चालू आर्थिक वर्षात (2021-22) 23.7 अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, त्यापैकी जानेवारी 2022 पर्यंत 70% पेक्षा जास्त म्हणजे 17.20 अब्ज डॉलर्स साध्य झाले आहे आणि उर्वरित उद्दिष्ट निर्धारित कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
कृषी उत्पादनांची निर्यात एका नव्या उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवून,अपेडाने भारतातून होणाऱ्या निर्यातीला प्रोत्साहन आणि वाढीसाठी व्यवसाय सुलभ करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान -सक्षम उपक्रमांना प्रोत्साहन दिले. प्रशासन अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनवण्यासाठी अपेडाने पेपरलेस ऑफिस (पुनर्रचना, डिजिटल स्वाक्षरी, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधा), अपेडा मोबाइल अॅप, टप्प्याटप्प्याने ऑनलाइन सेवा पुरवणे, देखरेख आणि मूल्यमापन, समान सुगम्यता आणि आभासी व्यापार मेळावा यासारखे उपक्रम हाती घेतले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ आवाहन लक्षात घेऊन, अपेडा स्थानिक पातळीवरील जीआय टॅग केलेल्या तसेच स्वदेशी, विशिष्ट कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर भर देत आहे. नवीन उत्पादने आणि नवीन निर्यातीची ठिकाणे निवडण्यात आली असून त्यानुसार ट्रायल शिपमेंटची सोय करण्यात आली आहे.
आतापर्यंत, 417 नोंदणीकृत जीआय उत्पादने आहेत आणि त्यापैकी सुमारे 150 जीआय टॅग उत्पादने कृषी आणि खाद्यपदार्थ आहेत, त्यापैकी 100 हून अधिक नोंदणीकृत जीआय उत्पादने अपेडा शेड्यूल्ड उत्पादने (कडधान्ये, ताजी फळे आणि भाज्या, प्रक्रिया केलेली उत्पादने) या श्रेणीत येतात.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798084)
Visitor Counter : 334