संरक्षण मंत्रालय
एलसीए तेजस सिंगापूर एअर शो - 2022 मध्ये होणार सहभागी
Posted On:
12 FEB 2022 2:27PM by PIB Mumbai
`सिंगापूर एअर शो-2022` मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची 44 सदस्यांची तुकडी आज सिंगापूरमधील चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. हा एअर शो 15 ते 18 फेब्रुवारी 2022 दरम्यान होणार आहे. सिंगापूर एअर शो हा एक द्विवार्षिक कार्यक्रम आहे जो जागतिक स्तरावरच्या विमान वाहतूक उद्योगाला त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो.
भारतीय हवाई दल स्वदेशी बनावटीचे तेजस एमके – I लढाऊ विमान यावेळी जगभरातील सहभागी देशांपुढे सादर करणार आहे. तेजस विमान आपल्या एरोबॅटिक्सच्या प्रदर्शनासह त्याच्या उत्कृष्ट हाताळणीची वैशिष्ट्ये आणि कुशलता दाखवून प्रेक्षकांना भुरळ घालेल. हवाई कसरींमध्ये भारतीय दलाचा सहभाग भारताला तेजस विमानाचे प्रदर्शन करण्याची आणि आरएसएएफ (रॉयल सिंगापूर एअर फोर्स) आणि अन्य सहभागी तुकड्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.
पूर्वी भारतीय हवाई दलाने स्वदेशी विमाने आणि एरोबॅटिक संघ तयार करण्यासाठी मलेशियामध्ये एलआयएमए – 2019 आणि दुबई एअर शो – 2021 सारख्या एअर शोमध्ये भाग घेतला होता.
***
S.Patil/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1797892)
Visitor Counter : 299