पर्यटन मंत्रालय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी पर्यटन क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली


महामारीनंतर दोन्ही देशांमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार

Posted On: 11 FEB 2022 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2022

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी 11 फेब्रुवारी 2022 रोजी नवी दिल्ली येथे पर्यटन क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने या सामंजस्य करारावर, वाणीज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांनी स्वाक्षरी केली आणि ऑस्ट्रेलिया सरकारच्या वतीने खासदार, व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक मंत्री  डॅन तेहान यांनी स्वाक्षरी केली.

पर्यटन क्षेत्रातील सामंजस्य करारामुळे सहकार्य वाढेल आणि पर्यटन क्षेत्रातील द्वीपक्षीय संबंधांच्या विस्तारास प्रोत्साहन मिळेल. या सामंजस्य करारामुळे पर्यटनाशी संबंधित माहिती आणि डेटाची देवाणघेवाण, पर्यटन हितधारक, विशेषत: हॉटेल्स आणि सहल आयोजक यांच्यातील सहकार्य, पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील प्रशिक्षण आणि शिक्षण प्रदाता यांच्यातील सहकार्य आणि देवाणघेवाण, पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील गुंतवणूक, सहल आयोजक आणि घाऊक विक्रेते यांच्या भेटी, प्रसारमाध्यमे आणि मत व्यक्त करणारे, उच्च दर्जाचा, सुरक्षित, नैतिक आणि शाश्वत पर्यटन विकास, प्रमुख सांस्कृतिक, कलात्मक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये स्वारस्य, एकमेकांच्या देशातील लागू कायदे, नियम आणि सूचना यांवर प्रवासी शिक्षणाच्या संधी आणि बहुपक्षीय व्यासपीठावर वाढवलेला पर्यटन सहभाग यात मदत होईल.

ऑस्ट्रेलिया हे भारतासाठी सर्वात महत्त्वाचे पर्यटनसंधी निर्माण करणार्‍या बाजारपेठांपैकी एक आहे (2019 मध्ये देशात परदेशी पर्यटकांच्या आगमनात 4 थ्या क्रमांकावर आहे आणि देशातील परदेशी पर्यटकांचा एकूण पर्यटन वाटा 3.4% आहे). ऑस्ट्रेलियासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याने या महत्त्वाच्या स्रोत बाजारपेठेतून पर्यटकांचे आगमन वाढण्यास मदत होईल.

 

S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1797816) Visitor Counter : 215


Read this release in: English , Urdu , Hindi