गृह मंत्रालय
4 था भारत-युनायटेड किंगडम गृहमंत्रालयादरम्यान संवाद संपन्न
Posted On:
10 FEB 2022 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2022
भारत-युके दरम्यान आज 4 था भारत-युके गृहमंत्रालय संवाद व्हर्च्युअल पद्धतीने पार पडला. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधीत्व केले तर युकेच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधीत्व मॅथ्यू रायक्रॉफ्ट यांनी केले.
या संवादामध्ये अंतर्गत सुरक्षा (होमलँड सिक्युरिटी), सायबर सुरक्षा, प्रत्यार्पण प्रकरणे, स्थलांतर आणि दळणवळण अशा विविध मुद्यांचा समावेश होता. प्रलंबित प्रत्यार्पण प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याची गरज भारताने युनायटेड किंगडमच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.
भारताने युनायटेड किंगडमधील काही दहशतवादी आणि कट्टरपंथी घटकांच्या भारतविरोधी कारवायांवर चिंता व्यक्त केली. यूकेच्या बाजूने अशा घटकांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्याचे आणि योग्य कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले. दोन्ही देशांमध्ये सुरक्षा सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली.
भारत आणि युके दोन्ही बाजूंनी सुरक्षेशी संबंधित द्विपक्षीय प्रतिबद्धता अधिक दृढ करण्यावर सहमती दर्शवत बैठकीचा समारोप केला.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1797332)