अणुऊर्जा विभाग

भारतीय आण्विक आस्थापना आणि अणुऊर्जा केंद्रे सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 10 FEB 2022 3:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2022

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, भारतीय आण्विक आस्थापना  आणि अणुऊर्जा केंद्रे सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित आहेत.


भारतीय आण्विक आस्थापनांमध्ये त्यांच्या स्थापनेसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणालींची रचना, विकास आणि कार्यान्वयन यासाठी आधीच कठोर प्रक्रिया निश्चित केलेली  आहे. नियामक पडताळणी आणि प्रमाणीकरणाच्या अधीन असलेले कस्टम बिल्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वापरून अंतर्गतच महत्वाच्या प्रणालींची रचना करून त्या विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रणाली सायबर सुरक्षा धोक्यांपासून प्रतिरोधक आहेत, राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.


भारतीय आण्विक आस्थापनांच्या नियंत्रण नेटवर्क आणि संयंत्रांची सुरक्षा प्रणाली यांसारख्या सुरक्षितता आणि सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा या इंटरनेट आणि स्थानिक माहिती तंत्रज्ञान नेटवर्कपासून वेगळ्या आहेत.

अणुऊर्जा विभागांच्या उपकरणांची सायबर सुरक्षा/सुरक्षेसंदर्भातील माहिती बाबत लक्ष घालण्यासाठी  अणुऊर्जा विभागाकडे संगणक आणि माहिती सुरक्षा सल्लागार गट (सीआयएसएजी) आणि उपकरण योजना आणि नियंत्रण सुरक्षेसाठी कृती दल (टीएएफआयसीएस ) यांसारखे तज्ज्ञ गट आहेत.

 S.Tupe/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1797220) Visitor Counter : 169