संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय लष्कराकडून दारुगोळा साठ्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनची अंमलबजावणी सुरु

प्रविष्टि तिथि: 09 FEB 2022 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2022

 

भारतीय लष्कराने आजपासून त्यांच्या दारुगोळा वस्तूंच्या यादीसाठी  रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) टॅगिंगची अंमलबजावणी सुरू केली. मोठ्या तीन गटात विभागलेल्या  5.56 एम एम दारुगोळ्याचा समावेश असलेलली आरएफआयडी  टॅग केलेल्या दारूगोळ्याची पहिली खेप,  खडकीतील दारुगोळा कारखाना  येथून पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा डेपो डेपो (सीएडी)  पुलगाव येथे पाठवण्यात आली. आयुध सेवा  महासंचालकांच्या  हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

आयुध निर्माण मंडळाच्या (ओएफबी) कॉर्पोरेटायजेशननंतर, नव्याने निर्माण करण्यात आलेल्या म्युनिशन्स  इंडिया लिमिटेड (एमआयएल), पुणे या कंपनीच्या सहकार्याने  भारतीय लष्कराच्या आयुध सेवा संचालनालयाद्वारे आरएफआयडीची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

आरएफआयडी टॅगिंग हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेल्या जीएस -1 इंडिया या  जागतिक मानक संस्थेशी सल्लामसलत करून जागतिक मानकांशी सुसंगत  करण्यात आले आहे. आयुध सेवा महासंचालनालयाच्या कॉम्प्युटराइज्ड इन्व्हेंटरी कंट्रोल ग्रुपद्वारे (सीआयसीजी) चालवल्या जाणार्‍या एंटरप्राइझ रिसोर्स ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आरएफआयडी टॅग्ज लावण्यात येतील आणि हे टॅग्स मालाच्या स्थानाच्या मागोवा घेण्यासाठी (ट्रॅकिंग) उपयोगात आणले जातील.

दारुगोळ्या संदर्भात आगाऊ माहिती मिळण्याच्या दृष्टीने,आरएफआयडी उपाययोजनेची अंमलबजावणी ही दारुगोळ्याच्या व्यवस्थापनात बदल घडवून आणेल आणि मोठ्या प्रमाणातील दारुगोळ्याचे व्यवस्थापन आणि ट्रॅकिंग क्षमतेमध्ये मोठी सुधारणा करेल. या प्रयत्नामुळे दारुगोळा साठवणूक आणि सैनिकांद्वारे दारूगोळ्याचा वापर  अधिक सुरक्षित होईल आणि लष्कराला अधिक समाधान प्राप्त होईल. या अंमलबजावणीमुळे दारुगोळा डेपोमध्ये चालवल्या जाणार्‍या सर्व तांत्रिक उपक्रमांची  कार्यक्षमता वाढेल आणि माल वाहून नेण्याचा खर्च कमी होईल.


* * *

S.Thakur/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1797034) आगंतुक पटल : 333
यह लिंक इस वेबसाइट के बाहर एक वेब पेज पर ले जाएगा। जारी रखने के लिए OK क्लिक करें। रोकने के लिए Cancel क्लिक करें। :  
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी