PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
09 FEB 2022 8:02PM by PIB Mumbai

- Over 171 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- India's Active caseload currently stands at 8,92,828
- Active cases stand at 2.11%
- Recovery Rate currently at 96.70%
- 1,72,211 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,10,12,869
- 71,365 new cases recorded in the last 24 hours
- Daily positivity rate (4.54%)
- Weekly Positivity Rate (7.57%)
- 74.46 cr Total Tests conducted so far; 15,71,726 tests conducted in the last 24 hours
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona


नवी दिल्ली/मुंबई, 9 फेब्रुवारी 2022
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
गेल्या 24 तासात 53.61 (53,61,099) लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 170.87 (1,70,87,06,705) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 1,90,41,308 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
गेल्या 24 तासात 1,72,211 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,10,12,869 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 96.70% झाला आहे.
गेल्या 24 तासात 71,365 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 8,92,828 आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 2.11% आहे.
देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 15,71,726 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 74.46 (74,46,84,750) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 7.57% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.54% आहे.
इतर अपडेट्स :
महत्त्वाचे ट्विट्स
* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1797003)
अभ्यागत कक्ष : 202