युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्र राज्याकरिता एका खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रासह अनेक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

Posted On: 08 FEB 2022 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 फेब्रुवारी 2022

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याकरिता, खेलो इंडिया केंद्रांच्या स्थापनेसाठीचे 36 प्रस्ताव, एक खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्र उभारण्यासाठीचा एक प्रस्ताव आणि क्रीडाविषयक पायाभूत सुविधा निर्मितीचे 11 प्रकल्प मंजूर केले आहेत.

खेलो इंडिया योजना ही मागणी आधारित योजना असून या योजनेअंतर्गत सादर झालेले प्रस्ताव विचारात घेताना या प्रस्तावांची तंत्रज्ञानविषयक व्यवहार्यता, निर्धारित मानकांची पूर्तता तसेच निधीची उपलब्धता यांच्या आधारावर निर्णय घेतला जातो.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.


* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796609) अभ्यागत कक्ष : 189