भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

एच अँड एफ, बायन आणि जीआयसीएसआय या निधीचे व्यवस्थापन तसेच मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांद्वारे एथेनाहेल्थ समूह, इंकच्या अधिग्रहणाला भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) दिली मान्यता

Posted On: 08 FEB 2022 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 फेब्रुवारी 2022

 

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) एच अँड एफ, बायन आणि जीआयसीएसआय या निधीचे व्यवस्थापन तसेच मार्गदर्शन करणाऱ्या  संस्थांद्वारे एथेनाहेल्थ समूह, इंकच्या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे

प्रस्तावित संयोजनात एथेनाहेल्थ समूह, इंकचे प्रस्तावित संपादन समाविष्ट असून ही लक्ष्यित कंपनी आहे. हे अधिग्रहण  हेलमन अँड फ्रिडमन कॅपिटल पार्टनर्स X, एलपी, हेलमन अँड फ्रिडमन एक्झिक्युटिव्ह X, एलपी,एच अँड एफ एक्झिक्युटिव्ह X-A, एलपी अँड एच अँड एफ असोसिएट्स X, एलपी (निधी व्यवस्थापन आणि सल्लागार हेलमन फ्रिडमन एलएलसी एच-अँड-एफ), द्वारे झाले आहे. . बायन कॅपिटल फंड XIII, एलपी, बायन कॅपिटल फंड (एलयूएक्स) XIII, एससीएसपी, (बायन कॅपिटल इन्व्हेस्टर एलएलसी-बायन द्वारे व्यवस्थापित आणि सल्लामसलत केलेले फंड), व्हिगो इन्व्हेस्टमेंट्स पीटीई., लिमिटेड  (जीआयसी स्पेशल इन्व्हेस्टमेंट्स पीटीई लिमिटेड- जीआयसीएसआय द्वारे व्यवस्थापित आणि सल्लामसलत करणारी गुंतवणूकदार संस्था) आणि मिनर्व्हा होल्डको, इंक  हे सर्व अधिग्रहणकर्ते आहेत.

अधिग्रहणकर्ते समांतर विशेष उद्देश संस्था म्हणून स्थापित केले आहेत. त्यांचा मूळ व्यवसाय गुंतवणूक आहे, त्यांचे उद्दिष्ट भांडवली गुंतवणुकीतून नफा मिळवणे आहे.

लक्ष्यित कंपनीचा ऍक्सेस हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रा. लि.  (एक्सेस) मध्ये एक लहान हिस्सा आहे. ही कंपनी भारतातील ग्राहकांना आरोग्य क्षेत्रातील उत्पन्न व्यवस्थापन सेवा पुरवते.

प्रस्तावित संयोजनाच्या परिणामस्वरूप, मिनर्व्हा पॅरेंट, एलपी मार्फत आणि मिनर्व्हा बिडको, इंक द्वारे संपूर्णपणे नियंत्रित स्पर्धा कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार अधिग्रहणकर्त्यांचे लक्ष्यित कंपनीमध्ये अप्रत्यक्ष आणि संयुक्त नियंत्रण असेल.

सीसीआयच्या याविषयीच्या सविस्तर आदेशाची प्रतीक्षा आहे.


* * *

Jaydevi PS/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796493) Visitor Counter : 226


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu