वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतीय पादत्राणे आणि चर्मोद्योग विकास कार्यक्रम 1700 कोटी रुपयांच्या व्यय आराखड्यासह  सुरु ठेवण्यास मंजूरी

Posted On: 05 FEB 2022 8:53PM by PIB Mumbai

 

भारतीय पादत्राणे आणि चर्मोद्योग विकास कार्यक्रम- आयएफएलडीपी, सुरु ठेवण्यास मंजूरी मिळाली असून, त्यासाठी 1700 कोटी रुपयांच्या  व्यय आराखडा  मंजूर करण्यात आला आहे. 19 जानेवारी 2022 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने आयएफएलडीपीला 31 मार्च 2026 पर्यंत किंवा पुढचा आढावा, यापैकी जे लवकर असेल, तोपर्यंत या कार्यक्रमाला मुदतवाढ दिली आहे.

भारतीय पादत्राणे आणि चर्मोद्योग विकास कार्यक्रम आयएफएलडीपीची उद्दिष्टे चर्मोद्योग क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करणे, चर्मोद्योगाशी संबंधित पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधणे,अतिरिक्त गुंतवणूक सुविधा देणे,रोजगार निर्मिती आणि उत्पादन  वाढ अशी आहेत.  

आयएफएलडीपी अंतर्गत, 2021-26 या काळात मंजूर करण्यात आलेल्या उपयोजना खालीलप्रमाणे:-

(i) शाश्वत तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय प्रोत्साहन योजना (यासाठी 500 कोटी रुपये खर्च प्रस्तावित)

(ii) चर्मोद्योग क्षेत्रांचा एकात्मिक विकास (IDLS) करण्यासाठीची उपयोजना (यासाठी 500 कोटी रुपये खर्च प्रस्तावित).

(iii) संस्थात्मक सुविधांची स्थापना करणे ( यासाठी 200 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित)

(iv) चामडयाची पादत्राणे आणि इतर वस्तू मेगा समूह विकास (MLFACD)  या उपयोजनेसाठी 300 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित.

(v) चर्मोद्योग उत्पादने आणि पादत्राणे क्षेत्रातील भारतीय ब्रॅंडला प्रोत्साहन आणि त्यांची जाहिरात करणे (यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित)

(vi) यासाठी डिझाईन स्टुडिओ विकसित करणे ( 100 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित)

आधीच्या आयएफएलडीपी योजनेचा परिणाम 

या कार्यक्रमाचा थेट लाभ म्हणजे या क्षेत्रात झालेली रोजगार निर्मिती, विशेषत: महिलांना त्याचा लाभ झाला आहे, कौशल्य विकास, उत्तम दर्जाचे कामही क्षेत्र अधिक पर्यावरणस्नेही बनवण्यासाठी आणि शाश्वत उत्पादन व्यवस्था निर्माण होण्यास या योजनेमुळे पूरक परिस्थिती झाली आहे.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1795829) Visitor Counter : 290


Read this release in: Tamil , Hindi , English , Urdu , Telugu