कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

तंत्रज्ञान आधारित प्रशासन हा आता पर्याय नव्हे  तर गरज आहे; पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या नेतृत्वाखाली  नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान संशोधन  हे शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्य बनले आहे- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह


मिशन कर्मयोगीच्या क्षमता निर्मिती आयोगाच्या “लोक  प्रशासनातील नवसंशोधन” कार्यक्रमाचे डॉ जितेंद्र सिंह यांनी उद्घाटन केले

Posted On: 04 FEB 2022 7:00PM by PIB Mumbai

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानपृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री  (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह  यांनी म्हटले आहे  की, तंत्रज्ञान आधारित प्रशासन हा आता पर्याय नव्हे  तर गरज आहे; पंतप्रधान नरेंद्र  मोदींच्या नेतृत्वाखाली  नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान संशोधन  हे शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्य बनले आहे.

लोक सेवेतील यशस्वी नवोन्मेषाची ओळख करून देण्यासाठी मिशन कर्मयोगीच्या क्षमता निर्मिती आयोगाच्या  (CBC) लोक  प्रशासनातील नवसंशोधन  या कार्यक्रमाचे उद्‌ घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की विद्यमान आणि भविष्यातील नागरी सेवकांच्या क्षमता वाढीसाठी अभ्यास म्हणून हे उपयुक्त ठरेल. ते म्हणाले की, देशभरात  यशस्वी नवसंशोधनाला चालना देण्यासाठी ते  सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सीबीसी नॉलेज रिपॉझिटरीची, ज्ञान भांडाराची  निर्मिती  केली जाईल.

या कार्यक्रमात पोर्टलचा प्रारंभ  करण्यात आला. हे पोर्टल 4 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी केलेले नावीन्यपूर्ण संशोधन सामायिक  करण्यासाठी खुले असेल. क्षमता बांधणी आयोगाने  सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना https://innovateindia.mygov.in/cbc-inviting-innovations  वर त्यांचे  यशस्वी नवसंशोधन सामायिक करण्यासाठी आमंत्रित केले आहे.  नागरी सेवांच्या वार्षिक आरोग्य अहवालामध्ये निवडक संशोधकांना प्रशासन आणि सार्वजनिक सेवा वितरण वाढवण्यासाठी त्यांचे कौशल्य, सर्जनशीलता आणि विविध उपक्रम दाखवण्याची ही  संधी आहे. या  कार्यक्रमादरम्यान, आयोगाने विविध राज्यांतील तीन नवसंशोधकांना त्यांच्या नवोन्मेष प्रकल्पांसंबंधी अनुभव सांगण्यासाठी आमंत्रित केले होते.  टीआरटीआयचे  आयुक्त डॉ राजेंद्र भारुड यांनी महाराष्ट्रातील गावांमध्ये गटारमुक्त परिसरासाठी सोक पिट मॉडेलचे सादरीकरण केले. महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सह आयुक्त डॉ. राकेश गुप्ता यांनी हरियाणामध्ये नागरिकांना  पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुधारण्यासाठी राबवण्यात आलेल्या अंत्योदय सरल प्रकल्पाबाबत सादरीकरण केले; आणि  वलसाडच्या उपजिल्हाधिकारी क्षिप्रा आग्रे यांनी गुजरातमधील वलसाड येथे पुराबाबत पूर्वसूचना देणाऱ्या  प्रणालीवर सादरीकरण केले.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1795571) Visitor Counter : 134


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil