आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारत डिजिटल अभियाना अंतर्गत 15 कोटींहून अधिक राष्ट्रीय डिजिटल आरोग्य ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत
Posted On:
04 FEB 2022 4:35PM by PIB Mumbai
राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान (आता आयुष्मान भारत डिजिटल अभियान म्हणून ओळखले जाते) 15 ऑगस्ट 2020 रोजी सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये - अंदमान आणि निकोबार, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी येथे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले.
देशात, 25 जानेवारी 2022 पर्यंत, 15,05,92,811 आरोग्य ओळखपत्रे (आता एबीएचए – आयुष्मान भारत आरोग्य खाती म्हणून ओळखली जातात) तयार करण्यात आली आहेत. एबीडीएम साखळी अंतर्गत एकूण 15,016 आरोग्य सुविधा आणि 8,378 डॉक्टरांची नोंदणी करण्यात आली आहे.
आरोग्य ओळखपत्रे तयार करणे ऐच्छिक आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यासाठी, आरोग्य ओळखपत्रांचा वापर आणि फायदे याबद्दल राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण जागरूकता निर्माण करत आहे.
लसीकरण स्थळी, ओळखदर्शक पुरावा म्हणून ज्यांनी आधारकार्ड दिले आहे आणि कोविन व्यासपीठावरून नाव नोंदणी केली आहे, त्यांची व्हाक्सीनेटर द्वारे संमती घेतल्यानंतरच अशा लाभार्थ्यांसाठी एबीएचए क्रमांक (पूर्वी आरोग्य ओळखपत्र म्हणून ओळखले जाणारे) तयार केले गेले आहेत.
रुग्णालयांच्या स्तरावर उपलब्ध निधीच्या काही भागाव्यतिरिक्त, केंद्रीय आरोग्य मंत्रालय राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली, टेलिमेडिसिन सेवा इत्यादीसारख्या आरोग्य माहिती तंत्रज्ञान उपक्रमांच्या अंमलबजावणी आणि बळकटीकरणासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करत आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
N,Chitale/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795474)
Visitor Counter : 303