गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
प्रधानमंत्री आवास योजना - नागरी (PMAY-U) अंतर्गत केंद्र सरकारकडून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना मदत
Posted On:
03 FEB 2022 7:44PM by PIB Mumbai
गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी राज्य/केंद्रशासित प्रदेशांद्वारे केली जाते आणि जमीन व वसाहती हे राज्याचे विषय आहेत. तथापि, गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालय, 25.06.2015 पासून पात्र कुटुंब/लाभार्थींसाठी 2022 पर्यंत 'सर्वांसाठी घरे' या दृष्टिकोनाअंतर्गत, घरे बांधण्याकरिता प्रधानमंत्री आवास योजना-नागरी (PMAY-U) अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना पूरक केंद्रीय साहाय्य पुरवत आहे. योजनेंतर्गत कोणतीही लक्ष्य नाहीत. राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार योजनेअंतर्गत मागणीच्या आधारे, प्रकल्प प्रस्ताव तयार करते आणि राज्यस्तरीय मंजुरी आणि देखरेख समिती (SLSMC) च्या मान्यतेनंतर मंजुरीसाठी मंत्रालयाकडे सादर करते. 2017 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्रमाणित केलेल्या 1.12 कोटी घरांच्या मागणीच्या तुलनेत , या योजनेअंतर्गत मंत्रालयाने आतापर्यंत 1.14 कोटी घरे मंजूर केली आहेत.
पात्र लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी मंत्रालयाने, राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी प्रस्तावित आणि रीतसर मंजूर केलेल्या सर्व प्रकल्प प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. कोणतीही नवीन मागणी मंत्रालयाकडे प्रलंबित नाही. अभियान कालावधीपर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यास मंत्रालय तयार आहे.
गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्री हरदीप एस पुरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795205)
अभ्यागत कक्ष : 245