रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

भारतमाला परियोजनेअंतर्गत सुरु होणारे आर्थिक कॉरीडॉर

Posted On: 02 FEB 2022 5:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2022

भारतमाला परियोजनेच्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीत  9,000 किलोमीटर लांबीच्या आर्थिक कॉरीडॉर उभारण्याची संकल्पना प्रस्तावित आहे. त्यापैकी 6,087 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली असून उर्वरित कामाला येत्या 2 आर्थिक वर्षांमध्ये मंजूरी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत, 1,613 किलोमीटर लांबीची रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून शिल्लक रस्त्यांचे काम वर्ष 2026-27 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

 

 

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1794736) Visitor Counter : 234


Read this release in: English , Urdu , Tamil , Malayalam