संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

Posted On: 01 FEB 2022 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2022

 

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे,पीव्हीएसएम , एव्हीएसएम , व्हीएसएम  यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना डिसेंबर 1982 मध्ये कोअर  ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये नियुक्त करण्यात आले. जनरल ऑफिसर म्हणून त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील पल्लनवाला क्षेत्रात  ऑपरेशन पराक्रम दरम्यान इंजिनीअर रेजिमेंटचे नेतृत्व केले. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बरली (युनायटेड किंगडम)चे पदवीधर आहेत  आणि त्यांनी  हायर कमांड (एचसी) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (एनडीसी) अभ्यासक्रमांचे  शिक्षण घेतले आहे.

आपल्या 39 वर्षांच्या  कारकिर्दीत, त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडताना महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक नियुक्त्यावर काम केले आहे, यामध्ये वेस्टर्न थिएटरमधील स्ट्राइक कोरच्या इंजिनिअर  ब्रिगेड कमांड, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, पश्चिम लडाखच्या उंचावरील माउंटन विभाग   ईशान्येतील  कॉअर, कमांडर-इन-चीफ अंदमान आणि निकोबार कमांड (CINCAN) आणि पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ तसेच दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ यांचा समावेश आहे.

त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, तसेच लष्करप्रमुखांकडून आणि GOC-in-C कडून उत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्याकडून लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. लष्करात चार दशकांची शानदार कारकीर्द पूर्ण करून   मोहंती 31 जानेवारी 2022 रोजी सेवानिवृत्त झाले.


* * *

M.Iyengar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1794424) Visitor Counter : 302