अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एसपीएमसीआयएलने चलनी नोट मुद्रणालय, नाशिक आणि बँक नोट मुद्रणालय, देवास येथे प्रत्येकी नवीन बँक नोट प्रिंटिंग लाइन्स केल्या स्थापित

Posted On: 28 JAN 2022 7:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2022

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (एसपीएमसीआयएल) त्यांच्या आधुनिकीकरण उपक्रमांतर्गत चलनी नोट मुद्रणालय, नाशिक आणि बँक नोट मुद्रणालय, देवास येथे प्रत्येकी नवीन बँक नोट प्रिंटिंग लाइन्स स्थापित  केल्या आहेत.

27 जानेवारी 2022 रोजी नवीन बँक नोट प्रिंटिंग लाइनचे उद्‌घाटन चलनी नोट मुद्रणालय, नाशिक येथे वित्त मंत्रालयाच्या विशेष सचिव आणि आर्थिक सल्लागार मीरा स्वरूप आणि बँक नोट मुद्रणालय, देवास येथे वित्त मंत्रालयांच्या आर्थिक व्यवहार विभागाचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार शशांक सक्सेना यांच्या हस्ते, नाशिक मतदार संघाचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे, एसपीएमसीआयएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकी संचालक तृप्ती पात्रा घोष, एसपीएमसीआयएलचे (मनुष्यबळ विभाग) संचालक एस.के. सिन्हा,एसपीएमसीआयएलचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कुमार सिंह, बँक नोट मुद्रणालय, देवास चे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल आणि चलनी नोट मुद्रणालय, नाशिक चे  मुख्य महाव्यवस्थापक बोलेवार बाबू यांच्या उपस्थितीत आभासी माध्यमातून झाले.  

S.Thakur/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1793357) Visitor Counter : 204


Read this release in: English , Telugu , Urdu , Hindi , Tamil