रेल्वे मंत्रालय

रेल्वेत नोकरी मिळवण्यास इच्छुकांचा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभाग आढळल्यास रेल्वेत नोकरी मिळवण्याच्या बाबतीत त्यांना आजीवन बंदीला सामोरे जावे लागू शकते - रेल्वे मंत्रालय

Posted On: 25 JAN 2022 7:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022

रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्यास इच्छुक असलेल्यांकडून रेल्वे रुळांवर निदर्शने, रेल रोको, रेल्वे मालमत्तेचे नुकसान यासारख्या तोडफोड/बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आल्याचे  असे रेल्वे मंत्रालयाने आज जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये नमूद केले आहे.  अशा प्रकारची  कृत्ये  ही बेशिस्तीची सर्वोच्च पातळी असून यामुळे ते रेल्वे/सरकारी नोकरीसाठी अयोग्य ठरतात  असे या नोटिशीत म्हटले  आहे.  या बेशिष्ट वर्तणुकीचे चित्रीकरण  विशेष संस्थांच्या  मदतीने तपासले जाईल आणि बेकायदेशीर वर्तनात सहभाग आढळलेल्या उमेदवार/इच्छुक यांच्यावर पोलिस कारवाई तसेच रेल्वेची  नोकरी मिळविण्यावर आजीवन बंदी घातली जाईल.

रेल्वे भरती मंडळे (RRBs)प्रामाणिकपणे निष्पक्ष आणि पारदर्शक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहेत. रेल्वेच्या नोकरीसाठी इच्छुक/उमेदवारांनी  बेशिस्तपणे वागू नये किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करू पाहणाऱ्या घटकांच्या प्रभावाला बळी पडू  नये, असे आवाहन रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1792584) Visitor Counter : 194