उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला दिल्या शुभेच्छा

Posted On: 25 JAN 2022 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022

उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे -

73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या या आनंदाच्या प्रसंगी मी आपल्या देशातील सर्व नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभकामना देतो.

आपले संविधान हे आपले मार्गदर्शक आणि नैतिक तत्व आहे. आपल्या महान राष्ट्राची उभारणी आणि शासन ज्या पायावर उभारले गेले त्याचा पाया संविधान आहे. प्रजासत्ताक दिन हा आपल्या संविधानात समाविष्ट केलेल्या स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि सर्वांसाठी न्याय या महत्त्वाच्या तत्त्वांवरील आपला विश्वास पुष्टी करण्याचा एक योग्य प्रसंग आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या सर्वांसाठी आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या महत्त्वाच्या तत्त्वांवरील विश्वासाचा पुनरुच्चार करण्यासाठी प्रजासत्ताक दिन हा एक योग्य योग आहे. ज्यांच्या निस्वार्थ बलिदानामुळे या महान प्रजासत्ताकाचा जन्म झाला त्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही वेळ आहे.

या आनंदाच्या दिवशी, आपण आपल्या प्रजासत्ताकाच्या यशाचा उत्सव साजरा करूया आणि शांततापूर्ण, सौहार्दपूर्ण आणि प्रगतीशील भारताच्या निर्मितीसाठी स्वतःला समर्पित करण्याचा संकल्प करूया.

जय हिंद!"

या संदेशाची हिंदी आवृत्ती पुढे दिली आहे. –

मैं 73वें गणतंत्र दिवस समारोह के इस आनंदपूर्ण अवसर पर अपने देश के समस्त नागरिकों को हार्दिक बधाई और शुभकामनाएँ देता हूँ।      

हमारा संविधान हमारा मार्गदर्शक है और हमारा नैतिक मानदंड है। यह एक ऐसा शास्त्र है जो उस नींव का निर्माण करता है जिस पर हमारा महान राष्ट्र स्थापित है और जिसके द्वारा यह महान राष्ट्र शासित होता है। गणतंत्र दिवस हमारे संविधान में प्रतिष्ठापित स्वतंत्रता, समानता, बंधुत्व और सभी के लिए न्याय के पोषित सिद्धांतों के प्रति अपनी आस्था को दोहराने का उचित अवसर है। यह उन स्वतंत्रता सेनानियों को हार्दिक आभार प्रकट करते हुए याद करने का भी अवसर है जिनके नि:स्वार्थ बलिदानों से इस महान गणतंत्र का जन्म हुआ है।

आइए, इस आनंदपूर्ण दिवस पर हम अपने गणतंत्र की उपलब्धियों का गुणगान करें और शांतिपूर्ण, सामंजस्यपूर्ण और प्रगतिशील भारत का निर्माण करने की दिशा में सत्यनिष्ठा से स्वयं को समर्पित करने का संकल्प लें।

जय हिंद!

 

 

 

 

 

 

 

 

Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 (Release ID: 1792542) Visitor Counter : 264