विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
तळागाळातील नवोन्मेषींची तसेच पारंपरिक ज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांची उत्पादने ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध होणार
Posted On:
19 JAN 2022 8:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2022
एनआयएफ इन्क्युबेशन आणि उद्यमशीलता परिषद तसेच अमेझॉन इंडिया यांच्यातील नव्या भागीदारीमुळे तळागाळातील नवोन्मेषींची उत्पादने, उत्कृष्ट पारंपरिक ज्ञानधारकांची तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेवर आधारित नाविन्यपूर्ण उत्पादने लाखो ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
थेट बाजारपेठेत विक्रीसाठी तयार उत्पादनांवर आधारित तळागाळातील नवोन्मेषींच्या उत्पादनांच्या, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेवर आधारित नवकल्पना आणि उत्कृष्ट पारंपरिक ज्ञान आधारित उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीसाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (डीएसटी ) राष्ट्रीय नवोन्मेष फाऊंडेशन (एनआयएफ )या स्वायत्त संस्थेच्या तंत्रज्ञान व्यवसाय इनक्यूबेटर (टीबीआय), एनआयएफ इन्क्युबेशन आणि उद्यमशीलता परिषद (NIFientreC) आणि अमेझॉन इंडिया यांच्यात आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
स्टार्ट-अप संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात नेण्याच्या अनुषंगाने 16 जानेवारी, 2022 रोजी भारताच्या पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस म्हणून घोषित केल्यानंतर आणि चालू दशक हे भारताचे 'टेकेड ('‘techade’) असेल अशी घोषणा केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनीच अमेझॉन इंडिया आणि एनआयएफ इन्क्युबेशन आणि उद्यमशीलता परिषद यांच्यात हा सामंजस्य करार झाला.
एनआयएफ इन्क्युबेशन आणि उद्यमशीलता परिषदेचे कार्यकारी संचालक राकेश माहेश्वरी आणि अॅमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे (एएसएसपीएल) संचालक सुमित सहाय यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या घोषणांच्या अनुषंगाने स्थानिक स्टार्टअप्सकडून नाविन्यपूर्ण उत्पादनांचा व्यावसायिक प्रसार बळकट करण्यासाठी आणि भारताच्या स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी हा करार सहाय्य्यकारी ठरेल.
या सामंजस्य करारामुळे देशातील सामान्य लोकांपर्यंत तळागाळातील नवोन्मेषी उत्पादने पोहोचवण्यास गती मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि उपजीविकेची साधने निर्माण होतील. सर्वसमावेशक ई-वाणिज्य फायद्यांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने, देशातील दुर्गम भागातील नवोन्मेषींना हा करार सक्षम करेल.
मुख्य प्रवाहातील उद्योजकांद्वारे आणि स्टार्ट-अप्समधून रूपांतरीत युनिकॉर्नद्वारे उत्पादित उत्पादने नवीन नाहीत, मात्र या सामंजस्य करारामुळे देशाच्या ग्रामीण भागातील नवोन्मेषातून आणि सामान्य लोकांकडून निर्माण होणारी उत्पादने सर्वत्र उपलब्ध होतील. अधिक पर्याय उपलब्ध झाल्याने ग्राहकांना फायदा होईल,एखाद्या विशिष्ट परिसरातील अपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी, या नवकल्पनांचा हा उगम असून समाज आणि जगाला सर्वसमावेशक नवोन्मेष प्रदान करण्याच्या दिशेने हा प्रवास सुरू झाला आहे.
R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1791090)
Visitor Counter : 250