अर्थ मंत्रालय

जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी 4.500 कोटींहून अधिक किमतीच्या बनावट पावत्या बनवणाऱ्या टोळीचा लावला छडा; 1 अटक

Posted On: 14 JAN 2022 7:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2022

व्यवसायाच्या मुख्य ठिकाणी अस्तित्वात नसल्याचे आढळून आलेल्या काही बनावट कंपन्यांविरुद्ध DGGI अर्थात वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाद्वारे अलीकडेच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बनावट कंपन्यांमागील खऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी, जीएसटी विवरणपत्र प्रत्यक्षात कोठून भरले गेले याचा प्रत्यक्ष पत्ता तपासण्यात आला. त्यानंतर 06.01.2022 रोजी दिल्लीतील त्या जागेची झडती घेण्यात आली. मालक त्याच्या सर्व्हरवर विविध ग्राहकांना त्यांची आर्थिक खाती राखण्यासाठी ‘क्लाउड स्टोरेज’ सेवा पुरवण्यात गुंतलेला असल्याचे शोध मोहिमेदरम्यान आढळून आले.

शोध मोहिमेदरम्यान मोबाईल फोन, विविध चेकबुक, विविध कंपन्यांचे शिक्के आणि सिमकार्डसह मोठ्या प्रमाणात सदोष कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या व्यक्तींची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे, मोबाईल आणि ई-मेलचे विश्लेषण केल्यावर असे आढळून आले आहे की, या व्यक्ती दिल्लीतील संकुलात सापडलेल्या सर्व्हरवर दूरस्थपणे डेटा ठेवत आहेत.

टॅली डेटाच्या छाननीत असे दिसून आले आहे की या सिंडीकेटद्वारे 636 कंपन्या कार्यरत आहेत. त्याच्या सूत्रधाराने मान्य केले आहे की त्यांनी या कंपन्यांमध्ये फक्त पावत्या जारी केल्या आहेत आणि त्यांना कोणताही माल पुरवठा केलेला नाही. त्यांनी अंदाजे 741 कोटी रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) निहित असणाऱ्या अंदाजे 4,521 कोटी रुपये करपात्र मूल्य असलेल्या पावत्या जारी केल्या आहेत.

आत्तापर्यंत या कंपन्यांच्या विविध बँक खात्यांमध्ये असलेले 7 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. या संपूर्ण रॅकेटमागील सूत्रधाराला 13.01.2022 रोजी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

  

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1789988) Visitor Counter : 201


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu