शिक्षण मंत्रालय
परीक्षा पे चर्चा 2022 मध्ये व्यापक सहभागाचे धर्मेंद्र प्रधान यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
13 JAN 2022 7:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2022
"परीक्षा पे चर्चा 2022" च्या 5 व्या आवृत्तीत सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन मिळवण्याची संधी प्राप्त करण्याचे आवाहन केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.
2021 प्रमाणेच हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात प्रस्तावित आहे. सहभागींची निवड करण्यासाठी 28 डिसेंबर ते 20 जानेवारी 2022 या कालावधीत https://innovateindia.mygov.in/ppc-2022/ या संकेतस्थळावर विविध विषयांवर ऑनलाइन सर्जनशील लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निवडक विजेत्यांनी विचारलेले प्रश्न परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात दाखवले जातील.
या कार्यक्रमासाठी इयत्ता 9 ते 12 पर्यंतचे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची ऑनलाइन स्पर्धेद्वारे निवड केली जाईल. यासाठी https://innovateindia.mygov.in/ppc-2022/ वर थेट नोंदणी 28 डिसेंबर 2021पासून सुरु झाली असून 20 जानेवारी 2022 पर्यंत खाली सूचीबद्ध केलेल्या विषयांवरील लेखनासाठी नोंदणी करता येणार आहे.
● विद्यार्थ्यांसाठी विषय
कोविड -19 दरम्यान परीक्षा तणाव व्यवस्थापन रणनीती
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
आत्मनिर्भर भारतासाठी आत्मनिर्भर शाळा
स्वच्छ भारत,हरित भारत
वर्गात डिजिटल सहकार्य
पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलासंदर्भातील लवचिकता
● शिक्षकांसाठी विषय
a.नव्या भारतासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी ).
b.कोविड-19 महामारी: संधी आणि आव्हाने
● पालकांसाठी विषय :
बेटी पढाओ, देश बढाओ
लोकल टू ग्लोबल - व्होकल फॉर लोकल
शिकण्यासाठी विद्यार्थ्यांची आयुष्यभर तळमळ
माय जिओव्ही वरील (MyGov)स्पर्धांद्वारे निवडलेल्या सुमारे 2050 स्पर्धकांना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांकडून प्रशस्तिपत्रक आणि पंतप्रधानांनी लिहिलेल्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतील एक्झाम वॉरियर्स पुस्तकाचा समावेश असलेला विशेष परीक्षा पे चर्चा संच प्रदान केला जाईल.
S.Patil/ S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1789737)
आगंतुक पटल : 231