राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लोहरी, मकर संक्रांती, पोंगल, भोगाली बिहू, उत्तरायण आणि पौष पर्वाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा

Posted On: 12 JAN 2022 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 जानेवारी 2022


राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी लोहरी (जी  13 जानेवारी, 2022 रोजी येते), मकर संक्रांती, पोंगल, भोगाली बिहू, उत्तरायण आणि पौष पर्व (जे 14 जानेवारी 2022 रोजी येतात ) च्या पूर्वसंध्येला देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. .

राष्ट्रपतींनी आपल्या  संदेशात  म्हटले आहे की, “लोहरी, मकर संक्रांती, पोंगल, भोगली बिहू, उत्तरायण आणि पौष पर्वाच्या निमित्ताने मी देशात  आणि परदेशात राहणाऱ्या सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो  आणि शुभेच्छा देतो.

आपल्या देशात साजरे होणारे बहुसंख्य सण निसर्ग आणि शेतीशी असलेले आपले अविभाज्य नाते दर्शवतात. हिवाळा संपून वसंत ऋतू सुरू होत असल्यामुळे  लोहरी, मकर संक्रांती, पोंगल, भोगली बिहू, उत्तरायण आणि पौष पर्व हे सण म्हणजे पिकांच्या कापणीचा हंगाम असतो. लोक या पिकांचा  आनंद घेतात आणि हे सण साजरे करतात . त्याचबरोबर  आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची गरज देखील अधोरेखित करतात. हे केवळ भारतीय विविधतेचेच नव्हे तर आपल्या देशाच्या विविधतेतील एकतेचे देखील उदाहरण आहे.

मी देवाकडे प्रार्थना करतो की या सणांमुळे लोकांमध्ये बंधुभावाची भावना निर्माण होवो  आणि आपल्या देशात समृद्धी आणि आनंद नांदो .”

राष्ट्रपतींचा हिंदीतील संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1789468) Visitor Counter : 245