अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीबीडीटीने आयकर कायदा 1961 अंतर्गत मूल्यमापन वर्ष 2021-22 साठी आयकर विवरणपत्र आणि विविध लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याच्या मुदतीत केली वाढ

प्रविष्टि तिथि: 11 JAN 2022 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2022

 

कोविड महामारीमुळे करदाते तसेच इतर भागधारकांना येत असलेल्या अडचणी तसेच आयकर कार्यदा 1961 मधील तरतुदींनुसार विविध लेखा परीक्षण अहवालांच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मूल्यमापन वर्ष 2021-22 साठी आयकर विवरणपत्र तसेच विविध लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची कालमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

एफ. क्र.225/49/2021/ITA-II  मधील सीबीडीटी परिपत्रक क्र.01/2022 11.01.2022 ला जारी केले आहे. हे परिपत्रक www.incometaxindia.gov.in. वर उपलब्ध आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1789239) आगंतुक पटल : 324
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Tamil