वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारताला पहिल्या 25 मध्ये आणण्याचे ध्येय ठेवूया - पीयूष गोयल


पहिल्यावहिल्या स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताहाचे उद्घाटन

Posted On: 10 JAN 2022 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जानेवारी 2022

 

जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारताचे स्थान पहिल्या पंचवीसमध्ये घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग,  ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष  गोयल यांनी आज नवोन्मेष व्यवस्थेशी संबंधित सर्वांना केले.

2014 मध्ये भारत जागतिक नवोन्मेष निर्देशांकात असलेल्या 76 व्या स्थानावरून 2019 मध्ये 46 व्या नंबर वर झेप घेता झाला हे आपल्या स्टार्ट अप म्हणजेच नवोद्योगांमुळे शक्य झाले आहे, असे केंद्रीय मंत्री पीयूष  गोयल यांनी सांगितले. ते आज नवी दिल्लीत स्टार्टअप भारत नवोन्मेष सप्ताहाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते.

पहिल्यावहिल्या स्टार्ट अप नवोन्मेष सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यात सामील होता आल्याबद्दल आनंद व्यक्त करून गोयल त्यांनी आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचा भाग म्हणून नवोन्मेष उत्सव साजरा होत आहे असे स्पष्ट करून हे आपल्या सर्वांना स्टार्ट अप व्यवस्था  वृद्धिंगत करण्यासाठी कृतीशील होण्याचे आवाहन आहे असे सांगितले.

स्टार्टअप सप्ताह सोहळ्याचे संस्थात्मीकरण होऊन तो वार्षिक उत्सव म्हणून साजरा व्हावा असे मत मंत्रीमहोदयांनी व्यक्त केले. त्यामुळे आपल्याला नवसंशोधन, नवकल्पना आणि नव उत्साह याद्वारे स्टार्टअप्स व्यवस्थेचा आढावा घेता येईल असे मत मंत्रीमहोदयांनी व्यक्त केले.

आपण नवोद्योजकतेचा सोहळा करत असतानाच नवोद्योगांची भावी वाटचाल सुलभ व्हावी म्हणून भविष्याचा वेध घेणारा दृष्टीकोन विकसित होण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भारताचा 75वा स्वातंत्र्यदिन साजरे करणाऱ्या आझादी का अमृतमहोत्सव या उपक्रमाअंतर्गत भारतातील नवोद्योजकतेची व्याप्ती व प्रसार यांचे दर्शन घडवण्यासाठी साप्ताहिक नवोन्मेष सोहळा होत आहे.

जग महामारींच्या सततच्या लाटांना तोंड देत असताना भारतीय नवोद्योजकांनी लोकांच्या आरोग्याशी संबधीत नवोद्योगांचा विचार करावा असे आवाहनही पीयूष  गोयल यांनी यावेळी नवोद्योजकांना केले. 

 

* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788931) Visitor Counter : 209


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu