वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
येत्या 10 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत केंद्रसरकारकडून पहिला स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताह होणार आयोजित
देशातील प्रमुख स्टार्टअप्स, उद्योजक, गुंतवणूकदार, इनक्यूबेटर, आर्थिक सहाय्य करणाऱ्या संस्था, बँका, धोरणकर्ते इत्यादींना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून स्वयंउद्यमशीलता आणि नवोन्मेशाला उत्तेजन देण्यासाठी होणार उपक्रमाचे आयोजन
Posted On:
09 JAN 2022 6:40PM by PIB Mumbai
उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभाग (डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, DPIIT)यांच्या वतीने दिनांक 10 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत प्रथमच स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताह आयोजित केला जाणारआहे.भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दूरदृश्य प्रणालीद्वारे नवनिर्मिती सप्ताह साजरा करण्याचे उद्दिष्ट असून संपूर्ण भारतात उद्योजकतेची व्याप्ती प्रसार आणि त्याची सखोल स्तरावर रुजवणूक बघण्याची संधी या सप्ताहात मिळणार आहे.
विशेष म्हणजे, स्टार्टअप्सच्या विश्वात 2021 हे वर्ष 'युनिकॉर्नचे वर्ष' म्हणून ओळखले गेले आहे, ज्यात वर्षभरात चाळीसहून अधिक युनिकॉर्न्सची भर पडली आहे.
स्टार्टअप कंपन्यांच्या बाबतीत जागतिक नवनवीन उपक्रमांचे केंद्र म्हणून भारत उदयास येत आहे. आज भारतात स्टार्ट अप्स वेगाने वाढत असून क्षेत्रात तो तिसर्या क्रमांकावर आहे.उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभागाने (डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, DPIIT) आजपर्यंत 61,000 पेक्षा जास्त स्टार्टअप्सना मान्यता दिली आहे. देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात किमान एक तरी स्टार्टअप असून 633 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 55 उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशातल्या स्टार्टअप्सनी 2016 पासून 6 लाखांहून अधिक नोकऱ्या (रोजगार) निर्माण केल्या आहेत. 45% स्टार्टअप 2-टियर आणि 3-टियर शहरांत असून त्यापैकी 45% स्टार्ट अप्स महिला उद्योजकांनी सुरु केले आहेत. स्टार्टअप्समध्ये जागतिक मूल्य साखळीद्वारे भारताच्या एकात्मतेला गती देण्याची आणि जागतिक प्रभाव निर्माण करण्याची क्षमता आहे.
या स्टार्टअप आणि नवोन्मेष उत्सवाचे प्राथमिक उद्दिष्ट देशातील प्रमुख स्टार्टअप्स, उद्योजक, गुंतवणूकदार, इनक्यूबेटर्स, निधी सहाय्य करणाऱ्या संस्था, बँका, धोरणकर्ते आणि इतर राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय भागधारकांना एकत्र आणून उद्योजकतेचा उत्सव साजरा करणे आणि नव उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे आहे. शिवाय, याद्वारे स्टार्टअप व्यवस्थेसाठी पोषक वातावरण करण्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण करणे, उद्योजक व्यवस्था वाढवण्यासाठीची क्षमता विकसित करणे; स्टार्टअप गुंतवणूकीसाठी जागतिक आणि देशांतर्गत भांडवलाला एकत्रितपणे गती देणे; नवनिर्मिती आणि उद्योजकतेसाठी तरुणांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणे, स्टार्टअप्सना बाजारात प्रवेशाच्या संधी उपलब्ध करून देणे; आणि भारतातील उच्च-गुणवत्तेचे, उच्च-तंत्रज्ञान आणि काटकसरीच्या नवकल्पनांचे प्रदर्शन करणे ही उद्दिष्टेही समाविष्ट आहेत.
राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि भारत सरकारच्या विविध विभागांच्या सहभागाने, आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात स्टार्टअप व्यवस्थेच्या महत्त्वाच्या पैलूंवर संवादात्मक सत्रे, कार्यशाळा आणि संकल्पना आधारित सादरीकरण यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी पुढील संकेतस्थळावर संपर्क साधावा https://www.startupindiainnovationweek.in
***
R.Aghor/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1788781)
Visitor Counter : 229