रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशमध्ये 14,169 कोटी रुपयांच्या 336 किलोमीटर लांबीच्या 10 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी

Posted On: 07 JAN 2022 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जानेवारी 2022


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे 14169 कोटी रुपयांच्या 336 किलोमीटर लांबीच्या 10 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची आभासी माध्यमातून पायाभरणी केली. मथुरा-हाथरस-बुदौन-बरेली महामार्गाच्या विकासामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होईल आणि तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांवरील वाहतुकीच्या समस्या दूर होतील. आग्रा इनर रिंग रोड आणि यमुना द्रुतगती मार्गाला जोडणारा बायपास बांधल्यामुळे, आग्रा शहराची वाहतूक कोंडीपासून सुटका होईल. आग्रा-जलेसर-एटा रस्त्याच्या बांधकामामुळे पितळ उद्योगाच्या व्यापाऱ्यांची सोय होणार आहे.

गडकरी यांनी आज ब्रजच्या 84 कोसी परिक्रमा मार्गाच्या विकासाची घोषणा केली. हा मार्ग नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला जाईल आणि भारतमाला प्रकल्प टप्पा -2 मध्ये समाविष्ट केला जाईल. हा मार्ग अयोध्येच्या 84 कोसी परिक्रमा मार्गासारखा बनवला जाईल आणि परिसरातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांशी जोडला जाईल, असे ते म्हणाले. मथुरा व्यतिरिक्त हा मार्ग राजस्थान, हरियाणाच्या सीमावर्ती भागातून जाईल, असेही ते म्हणाले.

एकूणच या प्रकल्पांमुळे व्यापार सुविधा आणि व्यवसाय सुलभता निर्माण होईल. काच आणि बांगड्या उद्योगाला विशेष चालना मिळणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे आर्थिक विकासाबरोबरच रोजगाराच्या संधी वाढतील.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788379) Visitor Counter : 261