अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या पीएमएफएमई योजनेअंतर्गत सहा 'एक जिल्हा एक उत्पादन' ब्रँडची सुरुवात
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील, सोमदानाया ब्रांडसह अमृत फल, कोरी गोल्ड, काश्मिरी मंत्रा, मधु मंत्रा आणि दिल्ली बेक्स होल व्हीट कुकीज या उत्पादनांचा प्रारंभ
Posted On:
05 JAN 2022 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2022
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे मंत्री पशुपती कुमार पारस आणि राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि नाफेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्लीतील पंचशील भवन येथे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी पंतप्रधान औपचारिकीकरण योजनेअंतर्गत सहा एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी ) ब्रँडचे उद्घाटन केले. .
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी पंतप्रधान औपचारिकीकरण योजनेच्या ब्रँडिंग आणि विपणन घटकांतर्गत निवडक एक जिल्हा एक उत्पादनाचे 10 ब्रँड विकसित करण्यासाठी नाफेड सोबत करार केला आहे.यापैकी महाराष्ट्रातील ,सोमदानाया ब्रांडसह अमृत फल, कोरी गोल्ड, काश्मिरी मंत्रा , मधु मंत्रा आणि दिल्ली बेक्सचे होल व्हीट कुकीज अशा सहा ब्रँडचे उद्घाटन आज करण्यात आले.
सोमदाना हा ब्रँड महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक जिल्हा एक उत्पादन संकल्पने अंतर्गत भरड धान्यांसाठी विकसित करण्यात आला आहे. ग्लूटेन-मुक्त, लोह, फायबर आणि कॅल्शियमने समृद्ध असे नाचणीचे पीठ हे एक अद्वितीय उत्पादन आहे. याच्या 500 ग्रॅम पाकिटाची किंमत 60/- रुपये आहे.
आवळ्याच्या रसासाठी अमृत फल हा ब्रँड केवळ हरियाणातील गुरुग्रामसाठी जिल्हा एक उत्पादन संकल्पने अंतर्गत विकसित करण्यात आला आहे.हे उत्पादन अनोखी चव आणि आरोग्य लाभांसाठी.शुद्ध आवळ्याचा रस आणि लिंबूयुक्त नैसर्गिक अमृत आहे.याच्या 500 मिली बाटलीची स्पर्धात्मक किंमत . 120/- रुपये आहे.
कोरी गोल्ड ब्रँड धणे पावडरसाठी विकसित केला असून राजस्थानमधील कोटा जिल्ह्यासाठी ओळखले जाणारे एक जिल्हा एक उत्पादन आहे. या उत्पादनाला प्रादेशिक वैशिष्ट्यासह एक वेगळी चव आहे. 100 ग्रॅम पाकिटाची स्पर्धात्मक किंमत 34/- रुपये आहे.
काश्मिरी मंत्रा या ब्रँडच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममधील मसाल्यांचा अर्क उपलब्ध होणार आहे.जम्मू आणि काश्मीरसाठी एक जिल्हा एक उत्पादन घटकांतर्गत मसाल्यांसाठी काश्मिरी लाल मिर्ची उत्पादन विकसित करण्यात आले आहे. या उत्पादनाला एक वेगळी चव आहे आणि 100 ग्रॅम पाकिटाची किंमत 75/- रुपये आहे.
उत्तर प्रदेशमधील सहारनपूर, येथील मधासाठी एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेअंतर्गत मधु मंत्रा ब्रँड विकसित करण्यात आला आहे. मुक्त क्षेत्रातील मधमाश्यांनी गोळा केलेला हा मल्टीफ्लोरा मध आहे आणि या मधाच्या 500 ग्रॅम काचेच्या बाटलीची स्पर्धात्मक किंमत 185/-रुपये आहे.
व्होल वीट कुकी हे दिल्ली बेक्स या ब्रँड अंतर्गत विकसित केलेले दुसरे उत्पादन आहे. बेकरी एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेअंतर्गत दिल्लीसाठी हा ब्रँड आणि उत्पादन विकसित करण्यात आले आहे. नाफेडच्या मते, संपूर्ण गव्हापासून तयार करण्यात येणारी त्याचप्रमाणे साखरेऐवजी गूळ आणि वनस्पती तुपाऐवजी लोणी वापरण्यात आलेली ही संपूर्ण गव्हाची बिस्किटे हे अनोखे उत्पादन आहे. ३८० ग्रॅम पाकिटाची स्पर्धात्मक किंमत १७५/-रुपये आहे.
नाफेडने सांगितल्यानुसार, ग्राहकांच्या फायद्यासाठी सर्व उत्पादने ओलावा आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणाऱ्या अनोख्या आणि आकर्षक पॅकेजिंगमध्ये येतात यामुळे उत्पादनाचा वापरण्याचा दीर्घ कालावधी आणि ताजेपणा सुनिश्चित होतो. प्रत्येक उत्पादन हे नाफेडच्या विपणन कौशल्याचे विस्तृत ज्ञान आणि वारसा तसेच प्रक्रिया, पॅकेजिंग, पुरवठा आणि लॉजिस्टिक्समधील क्षमता आणि अनुभवाच्या आधारे विकसित केले गेले आहे.
पीएमएफएमई योजनेंतर्गत या उपक्रमाद्वारे, देशभरातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना (एमएफपीई) औपचारिक, श्रेणीसुधारित आणि बळकट करण्यासाठी सरकारच्या दूरदृष्टी, प्रयत्न आणि उपक्रमांबद्दल प्रोत्साहित करणे आणि आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य कारण्यासाठी त्यांना आणखी एक पाऊल जवळ आणणे हे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.
सर्व उत्पादने नाफेड बाजार, ई-वाणिज्य मंच आणि भारतातील प्रमुख किरकोळ दुकानांवर उपलब्ध असतील.
पीएमएफएमई योजनेबद्दल:
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी पंतप्रधान औपचारिकीकरण योजना (पीएमएफएमई) ही केंद्र पुरस्कृत योजना आहे, अन्न प्रक्रिया उद्योगाच्या असंघटित विभागातील विद्यमान वैयक्तिक सूक्ष्म-उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवणे आणि या क्षेत्राच्या औपचारिकीकरणाला चालना देण्यासाठी आणि शेतकरी उत्पादक संस्था, बचत गट आणि उत्पादक सहकारी संस्थांना त्यांच्या संपूर्ण मूल्य साखळीत पाठबळ देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. विद्यमान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांच्या श्रेणीसुधारणेसाठी आर्थिक, तांत्रिक आणि व्यावसायिक सहाय्य प्रदान करण्याच्या दृष्टीने 2,00,000 सूक्ष्म अन्न प्रक्रिया कारखान्यांना थेट मदत करण्याची या योजनेची संकल्पना आहे. या योजनेअंतर्गत 2020-21 to 2024-25 या पाच वर्षांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
अधिक तपशिलांसाठी, www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787780)
Visitor Counter : 649