विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

2021-वार्षिक आढावा – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय


विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक जागतिक निर्देशांकात भारताच्या क्रमवारीतील सुधारणा यावर्षीही सुरुच

सुपर कॉम्प्युटिंग मिशनच्या दिशेने भारताची यशस्वी वाटचाल सुरु

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्रयत्नांमुळे सर्व संस्थांना वैज्ञानिक पायाभूत सुविधा उपलब्ध

महिला वैज्ञानिकांना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा संस्थात्मक पाठिंबा

विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या पाठिंब्याने झालेल्या संशोधनामुळे सर्वांना परवडणारी आरोग्य व्यवस्था आणि सर्वांच्या कल्याणाच्या उद्दिष्टपूर्तीच्या प्रवासाला पाठबळ

स्थानिक पातळीवरील नवोन्मेष : व्होकल फॉर लोकल

Posted On: 28 DEC 2021 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2021

 

वर्ष 2021 मानवतेसाठी काही अभूतपूर्व आव्हाने घेऊन आले होते. या आव्हानांचा सामना करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या स्वायत्त संस्थांनी, स्वतःला सज्ज केले होते. गेल्या वर्षी कोविड-19 महामारीच्या काळात शिकलेल्या धड्याचा उपयोग करत, विभागाने विविध क्षेत्रात त्याची अंमलबजावणी केली. मग ती आरोग्यव्यवस्था असो, की शाश्वत विकास, ऊर्जा कार्यक्षमता, हवामान बदल, अन्न उत्पादन आणि अगदी आपण ज्याप्रकारे दैनंदिन काम करतो अशा सगळ्या क्षेत्रात विज्ञान-तंत्रज्ञान सुविधांचा वापर करत असतो. या सगळ्या क्षेत्रात येणाऱ्या समस्यांना विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने तोडगा शोधत, विभागाने या उपाययोजना जगासमोर आणल्या.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वर्ष 2021 मधील यशोगाथा

1.जागतिक स्तरावर विज्ञान आणि तंत्रज्ञान निर्देशांकात भारताच्या क्रमवारीत सुधारणा यंदाही सुरुच

जागतिक नवोन्मेष निर्देशांकानुसार (GII) जगातील 50 नवोन्मेषी  अर्थव्यवस्थांच्या यादीत, भारत 46 व्या स्थानावर पोहोचला आहे. एनएसएफ च्या  आकडेवारीनुसार, वैज्ञानिक प्रकाशनांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच पीएचडी पदव्या, उच्च शिक्षण व्यवस्था ; तसेच स्टार्ट अप्सच्या संख्येच्या बाबतीतही भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

2.सुपर कॉम्प्युटिंग मिशन मध्ये भारताची आगेकूच सुरुच

राष्ट्रीय सुपर-कॉम्प्युटर मिशन (NSM), अंतर्गत, जुलै 2021 पर्यंत चार नव्या सुपर कॉम्प्युटर्स देशात लावण्यात आले आहेत. 

3.विज्ञानविषयक पायाभूत सुविधा सर्व संस्थांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने केलेले प्रयत्न

सिनर्जिस्टीक ट्रेनिंग प्रोग्राम अशा नावाने एक विशेष अभियानाची घोषणा करण्यात आली असून, त्या अंतर्गत, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधांचा वापर करत, देशभरात उपलब्ध असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान सुविधांच्याअ मदतीने मनुष्यबळ आणि क्षमता बांधणीला पाठबळ देण्याचा उद्देश आहे.

4.महिला वैज्ञानिकांना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा संस्थात्मक पाठिंबा

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या महिला वैज्ञानिक कार्यक्रमाअंतर्गत ‘क्युरे’ (म्हणजेच महिला विद्यापीठांमध्ये नवोन्मेष आणि उत्कृष्टतेसाठी विद्यापीठीय संशोधनाचे एकत्रीकरण) अंतर्गत महिला पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये विशेष उपक्रम सुरु केला आहे. तसेच या उपक्रमासाठी प्रस्ताव देखील मागवले आहेत. त्याशिवाय 30 संस्थांनी ‘गती’(संस्थांमधे परिवर्तन घडवण्यासाठी लैंगिक समानतेला पाठबळ)  नावाने एक उपक्रम यावर्षीपासून सुरु केला आहे.

5. विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष (एसटीआय)  केंद्रांच्या माध्यमातून, समुदायांचे सक्षमीकरण , पॉइंट ऑफ केअर निदान चाचण्या आणि स्वयंउद्योजकतेला प्रोत्साहन देणारे उपक्रम

टेक-नीव@75  (Techनींव@75) हा कार्यक्रम म्हणजे, समुदायांच्या सक्षमीकरणासाठीकहा विशेष कार्यक्रम आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आला.समान, सर्वसमावेशक अशा आर्थिक विकासासाठी विज्ञान-तंत्रज्ञान आणि नवोन्मेष याला पाठबळ देण्यात येत आहे. तसेच, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत, एसटीआय व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘विज्ञान उत्सव’ हा नवा कार्यक्रम सुरु करण्यात आला असून, एक वर्षभर हा कार्यक्रम साजरा होणार आहे. तसेच विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने, सामुदायिक स्तरावर,  समुदाय कोविड प्रतिबंधक संसाधन केंद्रे (CCRRCs) स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याशिवाय, स्क्रब टाइफस या आजाराचे तिथल्या तिथे निदान करण्यासाठी डीएनए सेन्सर असलेले पेन ड्राईव्हच्या आकाराचे अॅप विकसित करण्यात आले आहे.

6. भारतात तंत्रज्ञान-आधारित सखोल संशोधनाला चालना देणारा उपक्रम सुरु करण्यासाठी  एसईआरबी –डीएसटी ची इंटेल इंडिया सोबत भागीदारी

विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन बोर्ड (एसईआरबी) यांनी इंटेल इंडिया यांनी भागीदारी करत, फायर म्हणजेच, ‘औद्योगिक संशोधनासाठी निधी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत, भारतीय संशोधन समुदाय लवकरच उद्योग-संबंधित संशोधनाला चालना देऊ शकेल.

7. राष्ट्रीय हॅकेथोनच्या माध्यमातून नागरिकांना आयओटी सेन्सर बोर्ड वापरुन समस्यांवर समाधान शोधण्यासाठी प्रोत्साहन

भारताशी संबंधित समाजाशी निगडीत  समस्यांवर समाधान शोधण्यासाठी, देशभरातील नागरिकांनी संवेदन-2021 –सेन्सिंग सोल्यूशन्स फॉर भारत’ या राष्ट्रीय हॅकेथोनमध्ये भाग घेतला. आयओसी म्हणजेच, इंटरनेट ऑफ थिंग्ज साठीचे सेन्सर बोर्ड वापरुन समस्यांवर समाधान शोधले.

 8. मेक इन इंडिया विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने भारतीय स्मार्ट, कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सुरु

मैला संकलनासाठी नवीन स्वचालित तंत्रज्ञान.

शॉर्ट सर्किट पासून पॉवर ग्रीडचा बचाव करण्यासाठी एक स्मार्ट व्यवस्था. 

स्वस्त सेमीकंडक्टर बनविण्याची प्रक्रिया विकसित करण्यात आली आहे आणि 20 व्होल्ट पर्यंत व्होल्टेज हाताळण्याची क्षमता असलेले इंटिग्रेटेड सर्किट (IC)  बनविण्यास सुरवात झाली आहे.

9. तंत्रज्ञानाच्या मदतीने  कार्बन उत्सर्जन कमी करून शाश्वततेकडे झेप: ईव्ही, पर्यायी आणि स्वच्छ उर्जा

मिशन संशोधन 2.0 चा भाग म्हणून, युरोपीयन कमिशन आणि इंग्लंडसोबत इमारतींच्या परवडणाऱ्या कमी कार्बन  हिटिंग आणि कुलिंगच्या नवोन्मेशी समुदायाचं नेतृत्व भारत करत आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी CCUS तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी आणि संशोधनाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, किमान ते कमाल पातळीपर्यंत तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी इतर ACT भागीदार देशांच्या सहकार्याने ACT#3 मध्ये भाग घेतला होता. 

संशोधकांनी 6BIO नावाचा एक पदार्थ शोधून काढला आहे. हा पदार्थ स्वमग्नता (Autism Spectrum Disorder - ASD) आजाराच्या अधिक चांगल्या उपचारात परिणामकारक आहे.

डीएनएमध्ये होणाऱ्या बदलांची नोंद ठेवणारे नवे तंत्रज्ञान अनेक आजारांच्या वेळेत निदान करण्यात मदत करते.

10. स्थानिक पातळीवरील नवोन्मेश: व्होकॅल फॉर लोकल.

राष्ट्रीय नवोन्मेष संघटना आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने संयुक्तपणे अनेक स्थानिक पातळीवरील संशोधनांसाठी मदत केली आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने करण्यात आलेले संशोधन हवामान बदलामुळे राज्य पातळीवर धोका, आरोग्य आणि इतर परिणामांचे मूल्यांकन करते.

11. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापनाचे काम अधिक प्रभावी

वाडिया हिमालय भूगर्भ शास्त्र संस्थेच्या संशोधकांनी आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर असलेल्या हिमबेस्टी खेड्यात आलेल्या भूकंपाचे पहिले भूगर्भशास्त्रीय पुरावे शोधून काढले. इतिहासात याची सादिया भूकंप म्हणून नोंद आहे, या भूकंपाने प्रचंड नुकसान झाले होते आणि इसवीसन 1697 मध्ये एक पूर्ण गाव उध्वस्त केले असा अंदाज आहे. हे निष्कर्ष पूर्व हिमालय क्षेत्रातील भूकंप धोका नकाशा तयार करण्यात योगदान देतील, ज्याची या क्षेत्रात बांधकाम आणि नियोजनात मोलाची मदत होईल.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी स्थानिक पातळीपासून ते प्रयोगशाळेपर्यंत सर्व स्तरावर शेती तंत्रज्ञानाला विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची मोलाची मदत असते.

सदाबहार ही आंब्याची, मोठ्या रोगांना आणि आंब्यावर पडणाऱ्या सामान्य रोगांना प्रतिरोध करणारी जात, वादळ आणि कीटकांपासून काजूचा झाडांचे संरक्षण करण्यासाठी आधार देणारी मुळे, दीर्घ अतिथंड हवामानाची गरज नसलेली आणि स्वपरागीकरण करणारी सफरचंदाची जात, हे स्थानिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. 

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने विकसित केलेले घनकचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान कचऱ्यातून संपत्तीची दिशेने होत असलेला प्रवास अधिक परिणामकारक करते.

दुग्धोद्पादन उद्योगातील गुंतागुंतीच्या उच्च मेद गाळाचे पृथःकरण करण्यासाठी नवा उच्च कामगिरी बायो रीअक्टर आणि शाश्वत प्रक्रिया पूर्व पद्धतीचे एकीकरण महत्वाची भूमिका बजावते.

जमिनीतील आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते वापरयोग्य बनविण्यात उच्च दर्जाचे बायोमिथेनेशन तंत्रज्ञान अतिशय उपयोग आहे. हे तंत्रज्ञान वापरून सांडपाणी तसेच जैविक घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून बायोगॅस आणि जैविक खत तयार केले जाऊ शकते.

12. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने अनेक नवीन तंत्रज्ञान विकसित

अतिसूक्ष्म पदार्थापासून बनविलेली, आपल्या विशिष्ट रासायनिक गुणधर्मामुळे प्रकाशित होणारी अतिशय स्थिर आणि बिनविषारी सुरक्षा शाई वापरून खोट्या ब्रँडेड वस्तू, औषधे, प्रमाणपत्रे आणि चलनी नोटा बनविण्याला पायबंद घालता येऊ शकेल.

सूक्ष्म विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या (INST) विज्ञानिकांनी अतिउच्च गतिशीलता इलेक्ट्रॉन गॅस तयार केला आहे. यामुळे मोठमोठी माहिती आणि संदेश एका उपकरणातून दुसऱ्या उपकरणाकडे सहजतेने पाठविली जाऊ शकते आणि माहिती साठविण्याची क्षमता वाढविली जाऊ शकते.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थांनी आरोग्य, वैद्यकीय उपकरणे, उर्जा यापासून ब्रह्मांडाची रहस्य उलगडणे यासारख्या विविध क्षेत्रातील संशोधनात मोलाची मदत केली आहे.

थिरूवनंतपुरम येथील श्री चित्रा तिरुनाल वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने बंगरूळ स्थित राष्ट्रीय अवकाश प्रयोगशाळेच्या (CSIR-NAL) सहकार्याने एट्रीयल सेप्टल डिफेक्ट ऑक्लूडर आणि इंटरकॅर्नियाल फ्लो डायव्हर्टर स्टेंट ही दोन जैववैद्यकीय रोपण उपकरणे विकसित केली आहेत.

जवाहरलाल नेहरू प्रगत विज्ञान संशोधन केंद्राने (JNCASR) विविध उपकरणांच्या वापरात वाया जाणारी उर्जा बंदिस्त करून तिचा पुनर्वापर करणारा पदार्थ शोधून काढला आहे.

आघारकर संशोधन संस्था, (ARI), पुणे, बिरबल साहनी पुराविज्ञान संस्था (BSIP), लखनऊ, विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत अभ्यास संस्था (IASST), गुवाहाटी आणि श्री चित्रा तिरुनल वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (SCTIMST), थिरूवनंतपुरम यांना कोविड - 19 नमुन्यांची चाचणी आणि सार्स - कोव्ह - 2 शोधून काढण्यासाठी नमुन्यांची चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली.

विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने (SERB) पृथ्वी आणि अवकाश विज्ञान क्षेत्रात भूगर्भीय धोके, हवामानाचे अंदाज वर्तविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लार्निंग विकसित करण्यासाठी 3 उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यास मान्य दिली Centres of Excellence (CoEs). भूविज्ञान मंत्रालयाशी जोडणारे नेटवर्क केंद्र म्हणून ही विकसित केली जातील.

जवाहरलाल नेहरू प्रगत विज्ञान संशोधन केंद्राच्या (JNCASR) चमूने एक मजबूत, फिरता सामुहिक ऑक्सिजन काँसंट्रेटर, ऑक्सिजानी बनवला आहे, जो ग्रामीण भागात वापरला जाऊ शकतो आणि आपत्कालीन परिस्थितीत कुठेही वेगाने वापरला जाऊ शकतो.

कोलकाता येथील भारतीय लागवड विज्ञान संस्थेने (IACS) डीएनए दुरुस्ती यंत्रणा आणि जीनोम स्थिरता या क्षेत्रात प्राथमिक संशोधन केले आहे.

भारतीय अंतरीक्ष संस्थेची लदाखच्या लेह जवळील हानले येथे असलेली भारतीय अंतरीक्ष वेधशाळा ही जगातील एक आशादायक वेधशाळा म्हणून नावारूपाला येत आहे.

D.Wankhede/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787510) Visitor Counter : 596


Read this release in: English , Tamil , Hindi , Malayalam