संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीमा रस्ते संघटनेने अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीशी लढा देत झोजी खिंड डिसेंबरनंतर खुली ठेवली

Posted On: 04 JAN 2022 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2022

सीमा रस्ते संघटनेने (BRO) ने 11,649 फूट उंचीवर असलेल्या  झोजिला खिंडीचा प्रवेश सुगम्य करत  पुन्हा एकदा उत्कृष्टतेचा मापदंड  उंचावला आहे, जो लडाख या केंद्रशासित प्रदेशाला देशाच्या इतर भागाशी जोडतो. प्रथमच झोजी  खिंड 31 डिसेंबरनंतरही वाहतुकीसाठी खुली  राहिली आहे.

विजयक आणि बीकन या आघाडीच्या प्रकल्पांद्वारे सीमा रस्ते संघटनेने हे यश संपादन केले. लडाखच्या सामाजिक-आर्थिक कल्याणाबरोबरच धोरणात्मक परिणाम असणारी रेषा  राखण्यासाठी ही खिंड खुली असण्याचा कालावधी  महत्वाचा  आहे. मागच्या वर्षी 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही खिंड खुली असण्याचा कालावधी वाढवण्यात आला  होता, सीमा रस्ते संघटनाशांतपणे  मात्र  निश्चितपणे अत्याधुनिक उपकरणांसह  आणखी काही बर्फ हटवून नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.

लडाख केंद्रशासित प्रदेश  प्रशासन आणि स्थानिकांनी या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. या अतिरिक्त कालावधीमुळे केंद्रशासित प्रदेश  प्रशासनाच्या  लॉजिस्टिक व्यवस्थेवरील भार कमी झाला शिवाय स्थानिक रहिवाशांना  कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी अतिरिक्त धान्यसाठा  आणि इतर सामुग्रीचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने मदत झाली .

2022 च्या पहिल्या तीन दिवसांत, बीआरओ आणि पोलिस कर्मचार्‍यांच्या सामूहिक मदतीमुळे  सुमारे 178 वाहने या खिंडीतून  प्रवास करू शकली आहेत. अशा प्रकारे, बर्फ साफ करण्याव्यतिरिक्त, रस्ता वाहतुकी -योग्य ठेवण्यासाठी  दररोज देखभाल ठेवावी लागते, जी बीआरओच्या कर्मयोगींच्या अथक आणि निस्वार्थ प्रयत्नांमुळे साध्य होते आहे.

 

 

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1787489) Visitor Counter : 244


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil