अर्थ मंत्रालय

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) कडून गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आर्थिक वर्ष 2020-21 साठी भारत सरकारला 240.41 कोटी रुपयांचा लाभांश सुपूर्द

Posted On: 03 JAN 2022 7:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2022

 

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) ने गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आर्थिक वर्ष 2020-21 साठी भारत सरकारला 240.41 कोटी रुपयांचा अंतिम लाभांश चुकता केला आहे जो 31 मार्च 2021 पर्यंत [आर्थिक वर्ष 2020-21 साठी कर पश्चात नफ्याच्या (PAT) 57%.) कंपनीच्या निव्वळ मिळकतीच्या 5% आहे.

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांना एसपीएमसीआयएलच्या  मुख्य व्यवस्थापकीय संचालक तृप्ती पी. घोष आणि संचालक (वित्त) अजय अग्रवाल यांनी लाभांशाचा धनादेश सुपूर्द केला.

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ने 2020-21 या वर्षात चलनी नोटा, नाणी, सिक्युरिटी पेपर, पासपोर्ट, सिक्युरिटी इंक आणि इतर सुरक्षा विषयक उत्पादनांच्या उत्पादनात आपले निर्धारीत लक्ष्य गाठले आहे.

 

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड विषयी

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही एक अनुसूचित -‘अ’ मिनीरत्न श्रेणी-I केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे, जो संपूर्णपणे भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या (DEA), वित्त मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.

 

* * *

Jaydevi PS/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787223) Visitor Counter : 177


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil