उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींकडून 2022 या नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशाला शुभेच्छा
Posted On:
31 DEC 2021 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2021
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी 2022 या नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशाला शुभेच्छा दिल्या आहेत.
“नववर्ष 2022 च्या निमित्ताने मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देत आहे.
नवीन वर्ष म्हणजे नव्या प्रारंभाचा काळ आहे. नवी लक्ष्ये आणि नवे संकल्प करण्याचा हा काळ आहे. या नववर्षाला आपण सर्व दयाळू, अधिक करुणामय आणि विचारशील मानव बनण्याचा संकल्प करुया.
या आनंदाच्या प्रसंगी आपण सर्व एकत्रितपणे आपल्या स्वतःला एक शांततामय, समृद्ध आणि सौहार्दपूर्ण समाजाच्या उभारणीसाठी वाहून घेण्याचा संकल्प करुया.
हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात शांतता, चांगले आरोग्य आणि आनंद घेऊन येवो.”
उपराष्ट्रपतींच्या इंग्रजी / हिंदी शुभेच्छा संदेशासाठी येथे क्लिक करा
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1786715)
Visitor Counter : 172