पोलाद मंत्रालय
पोलाद मंत्रालय - वर्ष अखेर आढावा 2021
Posted On:
28 DEC 2021 10:54AM by PIB Mumbai
पोलाद :
विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी देशांतर्गत जोमदार पोलाद उद्योग आवश्यक आहे. बांधकाम,पायाभूत संरचना, मोटार वाहन निर्मिती, भांडवली वस्तू, संरक्षण, रेल्वे यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांना पोलाद हा अतिशय आवश्यक घटक असल्याने या उद्योगाला महत्वाचे स्थान आहे. रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास या दृष्टीनेही पोलाद क्षेत्र महत्वाचे आहे. पुरवठा साखळी आणि ग्राहकोपयोगी वस्तू उद्योग यावर थेट आणि संलग्न प्रभावामुळे या उद्योगाचा अर्थव्यवस्थेवर गुणक प्रभाव आहे, भारत हा क्रूड पोलादाचा जगातला दुसरा मोठा उत्पादक देश आहे.
देशांतर्गत पोलाद क्षेत्र कल
उत्पादन आणि खप : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात पोलाद उत्पादन कामगिरी अतिशय उत्साहवर्धक राहिली असून एप्रिल-नोव्हेंबर 2021 या काळात क्रूड पोलादाचे उत्पादन 76.44 एमटी म्हणजे दशलक्ष टन आणि फिनिश पोलादाचे उत्पादन 72.07 एमटी राहिले. मागच्या तीन वर्षातल्या याच काळाच्या तुलनेत हे जास्त आहे. खालील आलेख गेल्या चार वर्षातले एकूण उत्पादन आणि खप दर्शवतो :
आयात- निर्यात विषयक चित्र
चालू वित्तीय वर्षात ( एप्रिल-नोव्हेंबर 2021 ) निर्यात 9.53 एमटी राहिली तर आयात 3.06 एमटी राहिली तर गेल्या वर्षी याच काळात निर्यात 10.78 एमटी आणि आयात 4.75 एमटी होती. 2019-20 (एप्रिल-नोव्हेंबर) मध्ये आयात 8. 36 एमटी आणि आयात 6.77 एमटी होती.
आत्मनिर्भर भारतासाठी प्रमुख उपक्रम :
देशांतर्गत निर्मिती : देशांतर्गत उत्पादित लोह आणि पोलाद उत्पादनांना प्राधान्य देणारे धोरण पोलाद मंत्रालयाने अधिसूचित केले आहे. देशांतर्गत पोलाद उद्योगाचा विकास आणि वृद्धी या दृष्टीने याची आखणी करण्यात आली आहे.
उत्पादन संलग्न प्रोत्साहन ( पीएलआय) योजना : विशिष्ट पोलादाच्या देशांतर्गत उत्पादनासाठीच्या 6322 कोटी रुपये व्ययाच्या पीएलआय योजनेला मंजुरी देण्यात आली असून तपशीलवार मार्गदर्शक सूचना 20 ऑक्टोबर 2021 ला अधिसूचित करण्यात आल्या आहेत. यामुळे क्षमतेत 25 दशलक्ष टनाची भर पडणार असून 40,000 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक आणि 5.25 लाख रोजगाराची निर्मिती अपेक्षित आहे.
इतर प्रमुख वैशिष्ट्ये
रशियासमवेत सामंजस्य करार : पोलाद निर्मिती साठी वापरण्यात येणाऱ्या कोकिंग कोल क्षेत्रात सहकार्यासाठी 14 ऑक्टोबर 2021 ला पोलाद मंत्रालय आणि रशियन फेडरेशन यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
भांडवली खर्च : पोलाद क्षेत्रातल्या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांनी, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-नोव्हेंबर या काळात एकूण भांडवली खर्च 5781.1 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत हा 75.7% जास्त आहे.
एनआयपी प्रकल्पांसाठी सुविधा : पोलाद कंपन्यांच्या एनआयपी अर्थात राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन प्रकल्पांशी संबंधित मुद्दे, पोलाद मंत्रालय संबंधित राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे तत्परतेने उपस्थित करत आहे. आंतर मंत्रालय सुकाणू समितीच्या द्वारे हे मुद्दे हाती घेतले जात असून या मुद्यांच्या निराकरणासाठी या समितीच्या 2021मध्ये 3 बैठका झाल्या.
सरकारी ई बाजारपेठ GeM: GeM अर्थात सरकारी ई बाजारपेठेद्वारे वस्तू आणि सेवा खरेदीत गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिल-नोव्हेंबर 2021 मध्ये नोंदवण्यात आलेल्या ऑर्डर मूल्यात आधीच्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 14 %वाढ नोंदवण्यात आली. सरकारी ई बाजारपेठेद्वारे पोलाद क्षेत्रातल्या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांनी, चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर 21 पर्यंतची तपशीलवार वस्तू आणि सेवा खरेदी आणि गेल्या वर्षी याच काळातली खरेदी खालीलप्रमाणे –
April-November, 2020
|
April-November, 2021
|
|
Organization
|
No. of Orders
|
Value of orders (Rs. in Crore)
|
No. of Orders
|
Value of orders
(Rs. in Crore)
|
Steel CPSEs
|
2116
|
72.15
|
7068
|
3638.63
|
एमएसएमई पेमेंट : एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाना, केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाकडून प्रलंबित देण्यांची असलेल्या स्थितीवर साप्ताहिक देखरेख ठेवली जाते. ही देणी विहित काळात आणि 45 दिवसात चुकती व्हावीत याची खातर जमा करण्यासाठी ही देखरेख ठेवली जाते. चालू वित्तीय वर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबर या काळात 97.4% देणी 30 दिवसात चुकती करण्यात आली आहेत.एप्रिल-नोव्हेंबर 2021 या काळात केंद्रीय पोलाद सार्वजनिक उपक्रमांनी, एमएसएमईना 3358.61 कोटी रुपये चुकते केले. आधीच्या वर्षीच्या याच काळातल्या 2041.61 कोटींच्या तुलनेत यात 64.5% वाढ आहे.
पोलादाचा वापर : विविध क्षेत्रात पोलादाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पोलाद मंत्रालयाकडून संयुक्तपणे कार्यशाळा/ वेबीनार यांचे आयोजन करण्यात येत असून याद्वारे विविध क्षेत्रात पोलादाच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या फायद्याविषयी जागृती निर्माण करण्यात येते. पोलाद मंत्रालयाने आयआयटी, रस्ते आणि वाहतूक मंत्रालय यामधल्या तज्ञांची एक समितीही स्थापन केली आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात, देशांतर्गत उत्पादित पोलादाला प्रोत्साहन देण्यासाठी या समितीने पथदर्शी आराखडा आखला आहे. तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालया समवेत स्थापन करण्यात आलेल्या या समितीने आपला अंतिम अहवाल ऑगस्ट 2021 ला सादर केला आहे.
कोविड 19 संदर्भात प्रतिसाद : कोविड- 19 च्या दुसऱ्या लाटेत देशाच्या द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आवश्यकतेची पूर्तता करण्यात पोलाद क्षेत्राचे मोलाचे योगदान राहिले आहे. पोलाद उद्योगाकडून 1 एप्रिल 2021 रोजी असलेल्या 538 टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्यात झपाट्याने वाढ करत 13मे 2021 ला सर्वोच्च म्हणजे 4,749 टन पुरवठा करण्यात आला. पोलाद कारखान्यांनी वायूरूप ऑक्सिजनचा उपयोग करत, 5,500 खाटांची क्षमता असणारी जम्बो कोविड काळजी सुविधा केंद्रेही उभारली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : 12 मार्च 2021 पासून सुरु झालेल्या India@75 अंतर्गत, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातल्या पोलाद कंपन्यांनी, साबरमती ते दांडी या मार्गादरम्यान गांधीजींचा स्वदेशी दृष्टीकोन ठळकपणे दर्शवणारे चित्ररथ, डिस्प्ले व्हॅन त्याचबरोबर पोलाद निर्मिती प्रक्रिया दर्शवणारे आणि इतर विषयांवरचे चित्ररथही सादर केले. सार्वजनिक क्षेत्रातल्या पोलाद कंपन्यांनीही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले.
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1786025)
Visitor Counter : 394