अर्थ मंत्रालय

प्राप्तीकर विभागाच्या नव्या ई- फाईलिंग पोर्टलवर, 4.67 कोटी रुपयांची करविवरण पत्रे भरण्यात आली

Posted On: 28 DEC 2021 10:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2021

 

प्राप्तीकर विभागाच्या नव्या ई- पोर्टलवर 27 डिसेंबर 2021 पर्यंत, 4.67 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची करविवरण पत्रे म्हणजे आयटीआर भरण्यात आली आहेत. काल, म्हणजेच 27 डिसेंबर रोजी, सर्वाधिक15.49 लाख करविवरण पत्रे भरण्यात आली असून करविवरण भरण्याची अंतिम तारीख, 31 डिसेंबर 2021 असल्याने,ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आर्थिक वर्ष 2021-22,मध्ये भरण्यात आलेल्या 4.67 कोटी रुपयांच्या आयटीआर पैकी, 53.6% आयटीआर 1 (2.5 कोटी), तर 8.9% आयटीआर- 2 (41.7 लाख), आणि 10.75% आयटीआर- 3 (50.25 लाख), 25% आयटीआर 4 (1.17 कोटी), आयटीआ5 (5.18 लाख), आयटीआर 6 (2.15 लाख), इतके आहेत. यापैकी 48.19% इतकी करविवरण पत्रे पोर्टलवरुन ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आली आहेत. तर उर्वरित  आयटीआर ऑफलाइन सॉफ्टवेअर वापरुन भरण्यात आले आहेत.  

यापैकी 3.91 कोटींपेक्षा अधिक करविवरण पत्रांची छाननी पूर्ण झाली असून, त्यापैकी 3.35 कोटी, आधार –आधारित ओटीपीवरुन करण्यात आली आहे.  गेल्या तीन दिवसांत, 27.7 आधार-ओटीपी विनंत्या निर्माण करण्यात आल्या आहेत.

ई- पडताळणी झालेल्या आय टीआर पैकी, 2.88 लाख आय टी आर ची पुढची प्रक्रिया सुरु झाली असून 1.07 कोटी  करपरतावे जारी करण्यात आले आहेत.


* * *

S.Kane/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1785934) Visitor Counter : 202