कोळसा मंत्रालय

वर्ष अखेर आढावा – 2021 – कोळसा मंत्रालय


कोळसा खाणींसंदर्भात वेगवान कामकाजासाठी मंजुरीकरिता एक खिडकी योजना सुरु

कोळसा आयात देखरेख प्रणालीची सुरवात

सीआयएल आणि एससीसीएल कडून 2021 (जानेवारी ते नोव्हेंबर 21 ) या काळात झालेली कोळसा खरेदी 645.32 दशलक्ष टन

व्यावसायिक कोळसा खाण लिलावासाठीचे निकष करण्यात आले उदार

दोन फेऱ्यामध्ये छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओदिशामधल्या 28 खाण पट्ट्यांचा लिलाव

चौथ्या आणि नुकत्याच झालेल्या लिलावाच्या फेरीत 99 कोळसा खाण प्रस्तावात समावेश

Posted On: 27 DEC 2021 12:02PM by PIB Mumbai

धोरण/ सुधारणा आणि निर्णय

सुधारणा

कोळसा खाण (सुधारणा) नियम 2021

कोळसा खाण (संरक्षण  आणि विकास ) कायदा 1974 (सीएमसीडी) आणि सीएमसीडी नियमावली समांतर अनुपालन दूर करत,व्यवसाय सुलभतेसाठी विविध अनुपालनांची आवश्यकता आणि समर्पकता पडताळून पाहण्यासाठी तसेच संबंधित प्रक्रिया सुटसुटीत, सुलभ आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी, नियमावली 1975 ला एका अनुपालनाच्या  ओझ्यातून कमी करत  रद्दबातल करण्यात आले. तसेच कोळसा खाण नियंत्रण नियम 2004 मध्ये कोळसा खाण नियंत्रण (सुधारणा )  नियम 2021द्वारे सुधारणा करण्यात आली. भारत सरकारच्या 09.08.2021 च्या राजपत्रात ती जी एस आर . 546(E) द्वारे प्रकाशित आणि अधिसूचित करण्यात आली.

खनिज सवलत (सुधारणा )  नियम 2021

एमएमडीआर म्हणजेच खाण आणि खनिजे ( विकास आणि नियमन ) सुधारणा कायदा 2021द्वारे 1957 च्या एमएमडीआर कायद्यात सुधारणा करण्यात आली. यामुळे खनिज  सवलत (सुधारणा ) नियम 1960 मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली. म्हणजेच एमसीआर 1960 मध्ये खनिज सवलत (सुधारणा )  नियम 2021 द्वारे योग्य त्या सुधारणा  करण्यात आल्या. 01.10.2021 ला राजपत्र अधिसूचना जी एस आर 717(E) द्वारे त्या अधिसूचित  करण्यात आल्या.

मंजुरीसाठी एक खिडकी योजनेचा प्रारंभ

कोळसा खाणींसंदर्भातल्या कामकाजाला वेग देण्यासाठी  केंद्र सरकारने 11.01.2021 ला कोळसा क्षेत्रासाठी एक खिडकी मंजुरी पोर्टल सुरु केले.   भारतात कोळसा खाण कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि मंजुऱ्याच्या सुविधा  हा एकीकृत मंच उपलब्ध करून देतो.

कोळसा आयात देखरेख प्रणालीची स्थापना :

डीजीसीआय अँन्ड एस अर्थात वाणिज्य गुप्तचर आणि सांख्यिकी महासंचालनालयाकडून आयात विषयक डाटा मिळण्यात मोठा काळ लागतो. यासंदर्भातला संकलित  डाटा दोन ते अडीच  महिन्यांनी प्राप्त होतो तर  पृथक्करण केलेला डाटा केवळ 3 ते साडेतीन महिन्यांनी मिळतो. म्हणूनच कोळसा आयात देखरेख प्रणाली निर्माण करण्यात आली, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मदतीने याची संयुक्त निर्मिती करण्यात आली आहे.

धोरण :

वाणिज्यिक कोळसा उत्खनन– 2014 मध्ये आणलेल्या लिलाव आधारित धोरणात खाजगी क्षेत्राच्या सहभागाला परवानगी देण्यात आली मात्र त्यांच्या स्वतःच्या कारखान्यातल्या वापरापुरतीच ती मर्यादित होती.  2020 मध्ये व्यावसायिक कोळसा उत्खननासाठी खाजगी क्षेत्राकरिता हे क्षेत्र खुले करण्यात आले.  18.06.2020 ला पंतप्रधानांनी व्यावसायिक उत्खननासाठी  पहिला यशस्वी लिलाव प्रक्रियेला सुरुवात केली, 19 कोळसा खाणी वितरीत करून त्याची समाप्ती झाली. आतापर्यंत छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश,महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांत 28 खाण पट्ट्यांचा लिलाव करण्यात आला आहे.  

( सविस्तर माहिती परिशिष्टात देण्यात आली आहे.)या 28 खाण पट्ट्यांच्या यशस्वी लिलावाद्वारे कोळसा धारक राज्याला होणारा नियोजित लाभ याप्रमाणे आहे- व्यावसायिक

व्यावसायिक खाणकामासाठी लिलावासाठी झालेल्या दुसऱ्या टप्यात      11 कोळसा खाणीना  एकच बोली आल्याने या 11 खाणीसाठी, दुसरा प्रयत्न करण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला. तांत्रिक बोलीसाठी अंतिम तारीख 29 नोव्हेंबर  2021होती. प्राप्त बोली 30.11.2021 उघडण्यात आल्या. 4 कोळसा पट्ट्यांसाठी एकूण सात बोली प्राप्त झाल्या. 11 कोळसा खाण पट्ट्यांसाठी दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या प्रयत्नात खुल्या केलेल्या खाणींचा तपशील परिशिष्ट – बी मध्ये देण्यात आला आहे.

.. तिसऱ्या टप्प्यात   88 कोळसा खाणी लिलावासाठी खुल्या करण्यात आल्या. ( तपशील परिशिष्ट – सी मध्ये ). व्यावसायिक खाणकामासाठी यशस्वी लिलाव झालेल्या 28 कोळसा खाणीतून अद्याप उत्पादनाला सुरवात व्हायची आहे.

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय व्यवहार मंत्री, प्रल्हाद जोशी यांनी 16 डिसेंबर 2021ला देशातल्या कोळसा खाणींच्या लिलावाच्या उद्‌घाटन   केलेल्या टप्प्यात चौथ्या टप्प्यात 24 नव्या खाणींसह, एकूण 99 खाणी लिलावासाठी खुल्या केल्या गेल्या आहेत. एकूण 99 खाणींपैकी, 59 खाणींमधील शोध, अनुमान पूर्ण झाले असून, 40 अंशतः संशोधित आहेत.

निर्णय

शाश्वत विकास विभाग : कोळसा खाण क्षेत्रात निरंतरता आणण्यासाठी, कोळसा मंत्रालयाने शाश्वत विकास विभाग सुरु केला आहे. सर्व कोळसा विषयक  सर्व सार्वजनिक उपक्रमांमध्येही हा विभाग असून कोळसा खाणींमध्ये उत्तम पर्यावरण व्यवस्थापन पद्धतींचा स्वीकार करण्याला प्रोत्साहन ज्यायोगे तिथे काम करणाऱ्या आणि जवळच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी उत्तम  पर्यावरण राखता येईल.

हरित उपक्रम

सामाजिक आणि पर्यावरण दृष्ट्या दायित्व – आतापर्यंत हाती घेण्यात आलेले हरित उपक्रम असे आहेत-

.. कोळसा खाण पर्यटना द्वारे लोकांच्या मनातली कोळसा खाणी विषयीची संकल्पना सुधारणे. चार इको पार्क पूर्ण आणि 2021च्या ऑक्टोबर पर्यंत पाच इको पार्कची पायाभरणी

..  खाणकाम झालेल्या क्षेत्रात जैवविषयक पुनर्निर्मिती आणि कोळसा खाणीच्या आजूबाजूच्या मोकळ्या परिसरात वृक्षलागवड

..घरगुती वापरासाठी खाणीतल्या पाण्याचा वापर आणि पिण्यासाठी आणि सिंचनासाठी खाणीतल्या पाण्याचा उपयोग  

पर्यावरण विषयक लेखाजोखा/ अभ्यास :

.. सीआयएलच्या 35 खाणींचा पर्यावरण विषयक लेखाजोखा घेण्याची प्रक्रिया आयसीएफआरईने सुरु केली असून 2021-22 पर्यंत ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. एससीसीएलच्या पाच खाणींचा पर्यावरण विषयक लेखाजोखा पूर्ण झाला आहे.

कोळसा आकडेवारी

..कोळसा उत्पादन सीआयएल आणि एससीसीएलचे 2021 मधले (जानेवारी 21  ते नोव्हेंबर 2021) या काळात 615.49 दशलक्ष टन (एमटी)

..सीआयएल आणि एससीसीएल कडून 2021 (जानेवारी ते नोव्हेंबर 21 ) या काळात झालेली एकूण कोळसा  खरेदी  645.32 दशलक्ष टन

.. सीआयएल आणि एससीसीएल कडून 2021 मध्ये उर्जा क्षेत्राला  पाठवण्यात आलेला कोळसा सीआयएल आणि एससीसीएल कडून 2021 मध्ये 516.35 दशलक्ष टन

.. सीआयएल आणि एससीसीएल कडून 2021 मध्ये करण्यात आलेला एकूण ई लिलाव (जानेवारी ते नोव्हेंबर 21 ) 116.30 दशलक्ष टन

उर्जा क्षेत्र जोडणी धोरण – शक्ती

22.05.2017 च्या उर्जा क्षेत्र जोडणी धोरण – शक्तीच्या अंमलबजावणीबाबत स्थिती आणि सुधारित शक्ती – कोळसा क्षेत्रात ज्या भागात भविष्यात संशोधन आवश्यक आहे अशी क्षेत्रे ओळखून संशोधन कार्याबाबत माहितीचा प्रसार करण्यासाठी त्यासाठी समर्पित   संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली.

 प्रोत्साहनात्मक उत्खनन  : केंद्रीय खाण नियोजन आणि आरेखन संस्थेच्या 2021-22 च्या वार्षिक आराखड्यात कोळसा क्षेत्रासाठी 1.38 लाख मीटर्स उत्खनन आणि लिग्नाईट मध्ये  0.12 लाख मीटर्स उत्खननाचा प्रोत्साहनात्मक कार्यक्रम/ एनएमईटी  (प्रादेशिक ) मध्ये समावेश आहे. खाण शोध महामंडळ, नागालँड आणि आसामचे खाण सुरक्षा महासंचालनालय आणि  केंद्रीय खाण नियोजन आणि आरेखन संस्थेद्वारे हा कार्यक्रम राबवला जात आहे.

2021-22 मध्ये तपशीलवार उत्खननाबाबतची प्रगती : 2021-22 साठी 7.50 लाख मीटरचे उद्दिष्ट ( विभागात्मक : 4.71 लाख मीटर, आउट सोर्सिंग 2.79 लाख मीटर ) प्रस्तावित  करण्यात आले होते. ऑक्टोबर  2021 पर्यंत 3.92 लाख मीटर या उद्दिष्टाच्या 97% म्हणजे 3.80 लाख मीटर उत्खनन करण्यात आले.  

कोळसाधारित क्षेत्र ( संपादन आणि विकास ) कायदा 1957 अंतर्गत संपादन करण्यात आलेली जमीन

 

 

परिशिष्ट I

व्यावसायिक खाणींसाठी दोन फेऱ्यामध्ये लिलाव करण्यात आलेल्या 28 कोळसा खाणींचे तपशील

परिशिष्ट –बी

लिलावाच्या दुसऱ्या प्रयत्नात खुल्या करण्यात आलेल्या 11 कोळसा खाणी

परिशिष्ट – सी

व्यावसायिक खाणींसाठी तिसऱ्या टप्य्यात लिलाव करण्यात आलेल्या 88 कोळसा खाणींचे तपशील

कोळसा खाणी विशेष तरतूद  कायदा 2015 अंतर्गत सुरु असलेल्या लिलावाच्या 13 व्या टप्य्यात आणि एमएमडीआर  कायदा 1957 अंतर्गत लिलावाच्या तिसऱ्या टप्य्यात   उपलब्ध केलेल्या  88 कोळसा खाणीपैकी 48  खाणी लिलावाच्या आधीच्या टप्प्यातल्या आहेत. उर्वरित 40 खाणी नवीन आहेत त्यांचा तपशील याप्रमाणे आहे-   

 

लिलावाच्या आधीच्या टप्प्यातल्या 48  खाणींचा तपशील याप्रमाणे आहे - 

S. No.

Name of the Coal Mine

State

PRC

1

Brinda

Jharkhand

0.68

2

Sasai

Jharkhand

3

Chitarpur

Jharkhand

3.45

4

Datima

Chhattisgarh

0.36

5

Jainagar

Jharkhand

NA

6

Khappa& Extn.

Maharashtra

0.3

7

Latehar

Jharkhand

NA

8

Machhakata

Odisha

30

9

Mahanadi

Odisha

10

North Dhadu

Jharkhand

8.15

11

NuagaonTelisahi

Odisha

20

12

Panchbahani

Chhattisgarh

NA

13

Ramchandi Promotion Block

Odisha

NA

14

Rawanwara North

Madhya Pradesh

1.26

15

Barapara

Chhattisgarh

NA

16

Barimahuli

Madhya Pradesh

NA

17

Barra

Chhattisgarh

NA

18

Bartap

Odisha

NA

19

Basantpur

Jharkhand

NA

20

Binja

Jharkhand

NA

21

Chintalpudi Sector A1

Andhra Pradesh

0.5

22

ChopnaShaktigarh

Madhya Pradesh

NA

23

DahegaonDhapewada&TondakhairiKhandala Combined

Maharashtra

2.01

24

Dharampur

Chhattisgarh

NA

25

Dhulia North

Jharkhand

14

26

Dip Side of Chatabar

Odisha

NA

27

Dolesara

Chhattisgarh

1.74

28

Eastern Part of Gorhi-Mahaloi

Chhattisgarh

1.74

29

Gawa

Jharkhand

NA

30

Ghutra

Chhattisgarh

NA

31

GondbaheraUjheni

Madhya Pradesh

4.12

32

HingnaBazargaon

Maharashtra

NA

33

Jamui

Madhya Pradesh

1

34

Jarekela

Chhattisgarh

1.74

35

JharpalamThangarghat

Chhattisgarh

1.74

36

KalambiKalmeshwar

Maharashtra

NA

37

Kardabahal-Brahmanbil

Odisha

10

38

Kosala West

Odisha

2

39

Maiki South

Madhya Pradesh

NA

40

Meghuli

Chhattisgarh

4

41

Merkhi West

Madhya Pradesh

NA

42

Phuljhari East & West

Odisha

10

43

Pipraul

Chhattisgarh

NA

44

Rajathari South

Madhya Pradesh

NA

45

Saradhapur North

Odisha

6

46

Somavaram West

Andhra Pradesh

1

47

Tentuloi

Odisha

2

48

Western Part of Gorhi-Mahaloi

Chhattisgarh

1.74

 

***

Jaydevi PS/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1785746) Visitor Counter : 345