आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतात 142.47 कोटीहून अधिक मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण


गेल्या 24 तासात 72 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.40%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6,358 नवे रुग्ण

देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या 75,456

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (0.64%),गेल्या 44

दिवसापासून 1 %पेक्षा कमी

Posted On: 28 DEC 2021 9:44AM by PIB Mumbai

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  72,87,547  मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार देशात आतापर्यंत एकूण   142.47  कोटीपेक्षा जास्त    (1,42,46,81,736)  मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,51,91,424  सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

 

यामध्ये यांचा समावेश आहे-

 

HCWs

1st Dose

1,03,87,043

2nd Dose

96,88,051

 

FLWs

1st Dose

1,83,84,989

2nd Dose

1,68,50,329

 

Age Group 18-44 years

1st Dose

49,51,42,331

2nd Dose

31,94,71,734

 

Age Group 45-59 years

1st Dose

19,35,18,168

2nd Dose

14,70,85,153

 

Over 60 years

1st Dose

12,08,30,878

2nd Dose

9,33,23,060

Total

1,42,46,81,736

 

गेल्या 24 तासात 6,450  रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण   3,42,43,945 

रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर   98.40% झाला आहे.

सलग   61 दिवसांपासून  15,000  पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 6,358  नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  75,456  असून  उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  0.22% असून  मार्च 2020 पासून सर्वात  कमी आहे.

देशभरात चाचण्यांची  क्षमता  व्यापक करण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 10,35,495  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 67.41  कोटीहून अधिक  (67,40,78,531)  चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 0.64%  असून गेले   44 दिवस  1% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.61%  असून   गेले  85  दिवस 2% पेक्षा कमी आणि   120 दिवस  3% पेक्षा कमी आहे.

***

Jaydevi PS/NC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1785732) Visitor Counter : 220