आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 141.70 कोटीहून अधिक
गेल्या 24 तासात 29 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या
भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.40%
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6,531 नवे रुग्ण
देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या 75,841
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (0.63%), गेल्या 43 दिवसापासून 1 %पेक्षा कमी
Posted On:
27 DEC 2021 9:58AM by PIB Mumbai
भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 29,93,283 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 141.70 कोटीपेक्षा जास्त (1,41,70,25,654) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,50,57,142 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत.
यामध्ये यांचा समावेश आहे-
|
HCWs
|
1st Dose
|
1,03,86,924
|
|
2nd Dose
|
96,81,544
|
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,84,851
|
|
2nd Dose
|
1,68,36,793
|
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
49,38,39,924
|
|
2nd Dose
|
31,53,00,398
|
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
19,32,20,452
|
|
2nd Dose
|
14,59,77,986
|
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,06,64,399
|
|
2nd Dose
|
9,27,32,383
|
|
Total
|
1,41,70,25,654
|
गेल्या 24 तासात 7,141 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,42,37,495
रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.40% झाला आहे.
सलग 60 दिवसांपासून 15,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
गेल्या 24 तासात 6,531 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 75,841 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.22% असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशभरात चाचण्या क्षमता व्यापक करण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 7,52,935 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 67.29 कोटीहून अधिक (67,29,36,621 ) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 0.63% असून गेले 43 दिवस 1% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.87% असून गेले 84 दिवस 2% पेक्षा कमी आणि 119 दिवस 3% पेक्षा कमी आहे.

***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1785443)
अभ्यागत कक्ष : 231