संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

सागर अभियान

Posted On: 26 DEC 2021 2:40PM by PIB Mumbai

 

सागर अभियानाअंतर्गत मे 2020 पासून भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या आणखी एका तैनातीचा एक भाग म्हणून, भारतीय नौदल जहाज केसरीने 25 डिसेंबर 2021 रोजी  मोझांबिक येथील मापुटो बंदरात प्रवेश केला.प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत अशीपरराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारत सरकारच्या इतर संस्थांच्या एकत्रित समन्वयाने करण्यात आलेली  जहाजाची ही आठवी तैनाती आहे.

या जहाजांची तैनाती  भारताचा  विस्तारित सागरी शेजार आणि या विशेष संबंधांना भारताने दिलेले महत्त्व अधोरेखित करते.सध्या सुरु असलेल्या दुष्काळ आणि महामारीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मोझांबिक सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याच्या दृष्टीने,आयएनएस  केसरीच्या माध्यमातून  अन्नाची 500 टन  मदत पाठवण्यात आली आहे.  मोझांबिकच्या सशस्त्र दलांच्या क्षमता बांधणीच्या  प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.यासाठी आयएनएस  केसरीच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली  दोन वेगवान इंटरसेप्टर विमाने आणि स्वसंरक्षण उपकरणे मोझांबिकच्या सशस्त्र दलांना सुपूर्द केली  जातील.

आयएनएस  केसरीने, लँडिंग शिप टँक (मोठे), मे - जून 2020 मध्ये मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मादागास्कर आणि कोमोरोस या देशांना  मानवतावादी आणि वैद्यकीय सहाय्य प्रदान करण्यासाठी अशाच प्रकारचे  अभियान  हाती घेतले होते, या अभियानाच्या माध्यमातून  अनेक ठिकाणी भारतीय नौदलाच्या वैद्यकीय सहाय्य पथकांच्या तैनातीचा समावेश होता.

मे 2020 पासून, भारतीय नौदलाने सागर मोहिमांतर्गत 15 मित्र राष्ट्रांमध्ये जहाजे तैनात केली आहेत. समुद्रात 215 दिवसांपर्यंत असलेल्या या जहाजांच्या तैनातींमुळे एकूण 3,000 मेट्रिक टन  पेक्षा जास्त अन्न सहाय्य, 300 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन, 900 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि 20 आयएसओ कंटेनर्सची मदत दिली आहे.या मोहिमा हाती घेत असताना, भारतीय नौदलाच्या जहाजांनी 40,000 एनएम इतके एकूण अंतर पार केले आहे जे पृथ्वीच्या परिघाच्या जवळपास दुप्पट आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात मानवतावादी सहाय्य वेळेत पोहोचवण्याच्या दृढ हेतूने, भारतीय नौदलाच्या जहाजे आणि किनारी संघटनांच्या कर्मचार्‍यांनी आपल्या मित्र राष्ट्रांना  मदत पोहोचवण्यासाठी सुमारे दहा लाख तास काम केले आहे.

***

S.Thakur/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1785301) Visitor Counter : 244