कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालयाने आणखी दोन कोळसा खाणींचा केला लिलाव
आतापर्यंत तीस खाणींचा व्यावसायिक लिलाव झाला असून; 8158 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता
Posted On:
25 DEC 2021 5:54PM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालयाने दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी व्यावसायिक खाणकामासाठी 11 कोळसा खाणींचा लिलाव करण्याची दुसरी फेरी सुरू केली होती आणि त्यात 4 खाणींसाठी निविदा प्राप्त झाल्या होत्या. दोन खाणींसाठी अनेक निविदा प्राप्त झाल्या होत्या आणि त्यासाठी लिलाव आयोजित केला होता.
या लिलावाचे निकाल खालीलप्रमाणे आहेत.
|
S. No
|
Name of the Mine
|
State
|
Status of Exploration
|
PRC (mtpa)
|
Geological Reserves (MT)
|
Preferred Bidder
|
Initial Offer
(%)
|
Final Offer (%)
|
Annual Revenue Generated (Rs. Cr.)
|
|
1
|
Lalgarh (North)
|
Jharkhand
|
Explored
|
1.00
|
27.038
|
Adhunik Power and Natural Resources Ltd.
|
11.00
|
48.50
|
213.22
|
|
2
|
Beheraband North Extn*
|
Madhya Pradesh
|
Partially Explored
|
NA
|
170.00
|
Auro Coal Private Ltd.
|
8.50
|
9.50
|
NA
|
*अंशतः उत्खनन झालेली ही कोळसा खाण आहे आणि म्हणून या खाणीसाठी PRC उपलब्ध नाही. म्हणून, या कोळसा खाणीतून किती वार्षिक महसूल मिळेल याची गणना सध्या करता येणार नाही.
अशाप्रकारे लिलावाचे आयोजन करून, कोळसा मंत्रालयाने जून 2020 मध्ये पहिल्या टप्प्यात आरंभ झाल्यापासून आजपर्यंत 30 खाणींचा यशस्वीपणे लिलाव केला आहे (त्यात 23 पूर्ण अन्वेषण केलेल्या खाणी आणि 7 अंशतः खणलेल्या खाणींचा समावेश आहे). आजपर्यंत लिलाव झालेली एकूण पीक रेट क्षमता 63.17 MTPA आहे अंदाजे 27.78% च्या सरासरीप्रमाणे 4% फ्लोअर किमतीच्या तुलनेच्या प्रीमियमसह बाजारातील कोळशाच्या खाणींची जोरदार मागणी दर्शवते. या खाणींमधून एकूण वार्षिक उत्पन्न ~ 8158.03 कोटी आणि अंदाजे 85,406 रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.
व्यावसायिक कोळसा खाणीच्या लिलावात जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली आणि रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर, फार्मा इत्यादी सारख्या 'नॉन-एंड यूजर' श्रेणीतील अनेक सहभागी देखील प्रथमच लिलावात यशस्वी बोलीदार म्हणून उदयास आले, ही यांची सकारात्मक बाजू आहे. बिडिंग प्रक्रियेतून 'एंड यूज' निकष काढून टाकल्यानंतर खाण उद्योगात अधिक कार्यक्षमता आणि तांत्रिक प्रगती होण्याची अपेक्षा आहे.
***
S.Patil/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1785159)
अभ्यागत कक्ष : 251