आयुष मंत्रालय
वर्षाअखेरचा आढावा : आयुष मंत्रालय
1014 ते 20 दरम्यान आयुष उत्पादनांचा चा बाजारातील हिस्सा 17% नी वाढून 1 कोटी 81 लाख अमेरिकन डॉलर्स इतका झाला.
कोविड 19 रुग्णांच्या उपचारांसाठी सर्वात प्रभावशाली आयुष औषधे शोधण्यासाठी विभिन्न अभ्यासशाखांमधील तज्ज्ञांचे कृती दल
आयुष क्षेत्रात 5 महत्वाची पोर्टल्स सुरु केली , सर्व आयुष्य हितसंबंधींना याचा फायदा होणार
‘WHOmYoga’ ऍप आणि Y-break ऍप चा प्रारंभ
Posted On:
24 DEC 2021 12:35PM by PIB Mumbai
परंपरागत भारतीय औषध पद्धतीचे पुनरुज्जीवन आणि पुरस्कार करणे हे आयुष मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आयुष चे हितसंबंधी, उद्योग आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचण्यासाठी मंत्रालयाने अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये Y-break ऍप , AYUR-UDYAMAH , आयुष ग्रिड चा प्रारंभ इत्यादींचा समावेश आहे. 2021 सालात आयुष मंत्रालयाने जनतेच्या गरजा भागवण्याबरोबरच उद्योग क्षेत्रामध्ये आपला प्रभाव जगभर पसरवला. मंत्रालयाचे काही विशेष उपक्रम आणि उपलब्धी पुढीलप्रमाणे :
जगभरात जेव्हा कोविड 19 चे सावट पसरले होते, त्यावेळी या महामारीशी आयुष्य मंत्रालयाने लढा देण्यासाठी.
आयुष्य 64 च्या वितरणासाठी मंत्रालयाने एक देशव्यापी मोहीम सुरु केली होती. संशोधन मंडळाची 86 वैद्यकीय केंद्रे, आयुष मंत्रालयांतर्गत असलेली राष्ट्रीय संस्था आणि सेवा भारतीच्या सहकार्याने ही मोहीम राबवली गेली. आयुष 64 चा उपयोग सौम्य अथवा लक्षणविरहित कोविड 19 संसर्गाच्या उपचारात सामान्य औषधाच्या सोबत वापरण्यासाठी झाला होता. महामारीच्या सुरुवातीच्या काळात पसरलेल्या भीतीच्या वातावरणात आयुष औषधांच्या उपयोगाबद्दल जनता साशंक होती. त्यासाठी आयुष मंत्रालयाने एक समर्पित हेल्पलाईन सुरु केली होती. कोविड ने उभ्या केलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आयुष आधारित दृष्टिकोन आणि उपाय कसे उपयोगी ठरतात हे हेल्पलाईनमार्फत लोकांपर्यंत पोचले. हा टोल फ्री क्रमांक 14443 आहे.
सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिन प्रसंगी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘WHOmYoga’ ऍप ची घोषणा केली. या ऍप मधून सामायिक योग पद्धतीनुसार (CYP) विविध भाषांमधून योग प्रशिक्षण सोप्या पद्धतीने दिले जाते.
याशिवाय, कार्यरत व्यावसायिकांसाठी मंत्रालयाने Y-break हे ऍप सुरु केले आहे . तणावमुक्त होऊन पुन्हा ताज्या मनाने पूर्ण एकाग्रतेने काम सुरु करण्यासाठी मदत म्हणून या ऍप द्वारे कामाच्या ठिकाणीच 5 मिनिटे योग केल्याने कार्यक्षमता वाढू शकते.
आणखी एका उपक्रमात देशातील तीन नावाजलेल्या संस्थांनी एकत्रित येऊन कोविड 19 रुग्णांच्या मानसिक पुनर्वसनासाठी एक पद्धती विकसित केली आहे. आयुष मंत्रालयाची स्वायत्त अंग असलेली केंद्रीय योग व निसर्गोपचार संशोधन परिषद (CCRYN), राष्ट्रीय मानसिक आरोग्य व मज्जा विज्ञान संस्था (NIMHANS), बंगळुरू आणि स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान (S-VYASA ) या तीन संस्थानी एकत्र येवून ही पद्धती विकसित केली आहे.
आयुष मंत्रालय आणि महिला व बालविकास मंत्रालयाने एकत्रितपणे पोषक अन्नावर आधारित एक मोहीम सुरु केली होती. या मोहिमेत आयुष मार्गदर्शक सूचनांवर आधारित पूरक आहार , आणि एकत्र घेतल्यास पोषणमूल्य वाढवणारे अन्नपदार्थ यांची माहिती दिली गेली. याशिवाय औषधी आणि पोषक वनस्पतीविषयी माहिती देणारी मिशन कल्पतरू आणि कुपोषण तसेच ऍनिमिया वर आयुष पद्धतीचे उपचार सांगणे इत्यादी बाबीही त्यात समाविष्ट होत्या.
जेव्हा भारतातील आयुष क्षेत्र - संभावना आणि आव्हाने या नावाने संशोधन व माहिती प्रणाली (RIS) चा अहवाल प्रकाशित झाला तेव्हा आयुष च्या वाढत्या बाजार प्रभावाची योग्य कल्पना मिळाली. 2014 ते 20 दरम्यान बाजारातील आयुष चा हिस्सा 17 टक्क्यांनी वाढून तो 1कोटी 81 लाख अमेरिकन डॉलर्स पर्यंत पोचला असल्याची माहिती त्या अहवालात होती.
भारतातील स्टार्ट अप्स आणि स्टार्ट अप्स ची परिसंस्था सशक्त व जगातील सर्वश्रेष्ठ व्हावी यासाठी AYUSH -UDYAMAH चे उदघाटन केले गेले.
एका ऐतिहासिक घडामोडीत, जम्मू काश्मीर मधील शासकीय युनानी वैद्यकीय महाविद्यालय (GUMC &H) ने प्रथमच बचलर ऑफ युनानी मेडिसिन अंड सर्जरी BUMS चा अभ्यासक्रम सुरु केला आहे.
आयुर्वेदाशी संबंधित असलेली CTRI, AMAR, RMIS, SAHI आणि e -Medha या पोर्टल्स मुळे आयुष चे ऑनलाईन अस्तित्व अधिक ठळक झाले. CTRI अर्थात क्लीनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया हे आयुर्वेदाशी सम्बधित डेटा देणारे जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्लीनिकल ट्रायल रजिस्ट्री मंचावरील प्राथमिक नोंदींचे संकलन आहे. CTRI मधील डेटा मुळे आयुर्वेद उपचारपद्धतीतील अभ्यास निष्कर्ष नोंदवताना आयुर्वेदाची परिभाषा वापरता येईल.
स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना आयुष मंत्रालयाने अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. त्यातील एका व्याख्यानमालेद्वारे देशातील 75,000 शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आयुष प्रणालीची माहिती दिली गेली. तसेच Y-break ऍप च्या उपयोगांचीही माहिती दिली गेली.
दुसऱ्या उपक्रमात, रोगप्रतिबंधक उपायांचा अभ्यास करण्यासाठी वैद्यकीय प्रणाली (Clinical Protocol) तयार करण्याच्या हेतूने तसेच कोविड 19 च्या उपचारांमध्ये आयुष्य उपचारांची जोड देण्यासाठी मंत्रालयाने विभिन्न अभ्यासशाखांमधील तज्ज्ञांचे एक संयुक्त कृती दल तयार केले. या दलात भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था(ICMR), जैवतंत्रज्ञान विभाग (DBT), विज्ञान व औद्योगिक संशोधन संस्था (CSIR), अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्था (AIIMS), आणि आयुष संस्थांचा समावेश होता.
कोविड 19 च्या रुग्णांच्या वेगवान रोगमुक्तीसाठी ‘अश्वगंधा’ या वनस्पतीचा उपयोग- या विषयावर अभ्यास करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA)आणि इंग्लंड मधील लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडीसीन (LSHTM) या दोन संस्था एकत्र आल्या. इंग्लंडमधल्या 3 शहरांमध्ये 2,000 व्यक्तींवर ‘अश्वगंधा’ च्या चाचण्या घेण्यासाठी या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करारही झाला.
याबरोबरच आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी (ASU) औषधाचे उत्पादन करण्यासाठी कागदविरहित परवाने देणारी ऑनलाईन आवेदन प्रणाली आयुष मंत्रालयाने सुरु केली आहे.
आयुष मंत्रालयाने फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी (PCIM&H) आणि अमेरिकन हर्बल फार्माकोपिया (USA) या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार घडवून आणला आहे. यामुळे या दोन देशांमधील समानता आणि परस्पर फायद्याच्या आधारावर आयुर्वेद आणि इतर भारतीय उपचारपद्धतींमधील परिभाषा विकसित करण्यासाठी मदत होईल.
आयुष मंत्रालयाची सार्वजनिक क्षेत्रातील औषध उत्पादन आस्थापना, भारतीय औषधी व औषधविज्ञान महामंडळ, ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी 164.33 कोटींची (तात्पुरता आकडा) उलाढाल नोंदवली आहे. या आस्थापनेच्या इतिहासातील ही सर्वाधिक उलाढाल असून सर्वाधिक रु. 12 कोटींचा नफादेखील नोंदवला आहे.
***
Jaydevi PS/U.Raikar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1785154)
Visitor Counter : 226