आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 141 कोटींहून अधिक


गेल्या 24 तासात 66 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.40% गेल्या मार्च पासून उच्च स्तरावर

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 7,189 नवे रुग्ण

देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या 77,032 गेल्या 579 दिवसांतील सर्वात कमी

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (0.60%) गेल्या 41 दिवसापासून 1% पेक्षा कमी

Posted On: 25 DEC 2021 10:05AM by PIB Mumbai

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  66,09,113 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 141 कोटीपेक्षा जास्त   (1,41,01,26,404) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,49,64,300 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या  आहेत.

आज सकाळी प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार यामध्ये दिलेल्या  मात्रांचा समावेश‌ पुढील प्रमाणेआहे-

 

HCWs

1st Dose

1,03,86,851

2nd Dose

96,75,320

 

FLWs

1st Dose

1,83,84,748

2nd Dose

1,68,24,869

 

Age Group 18-44 years

1st Dose

49,24,32,222

2nd Dose

31,18,78,657

 

Age Group 45-59 years

1st Dose

19,28,71,451

2nd Dose

14,50,15,710

 

Over 60 years

1st Dose

12,04,64,476

2nd Dose

9,21,92,100

Total

1,41,01,26,404

 

गेल्या 24 तासात 7,286 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून)कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,42,23,263 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. परिणामी कोविडमधून रुग्ण बरे होण्याचा दर 98.40% झाला आहे.मार्च 2020 पासून हा सर्वात अधिक स्तरावर आहे.

सलग 58 दिवसांपासून 15,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 7,189 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 77,032 असून  गेल्या 579 दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे.उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.22% असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशभरात चाचण्या क्षमता व्यापक करण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 11,12,195 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 67.10 कोटीहून अधिक  (67,10,51,627) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 0.60% असून गेले 41 दिवस 1% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.65% असल्याची नोंद झाली आहे.दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 82 दिवस 2% पेक्षा कमी आणि 117  दिवस 3% पेक्षा कमी आहे.

***

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1785085) Visitor Counter : 167