राष्ट्रपती कार्यालय
नाताळच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून जनतेला शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
24 DEC 2021 5:35PM by PIB Mumbai
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना नाताळच्या पूर्व संध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘नाताळच्या पवित्र प्रसंगी सर्व नागरिकांना, विशेषकरून आपल्या ख्रिश्चन बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा’, असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव म्हणून नाताळ साजरा केला जातो. हा सण जनतेला शांतता, सौहार्द आणि करूणा यांचा संदेश देतानाच, समाजात एकोपा आणि बंधुत्वाला प्रोत्साहन देतो. येशू ख्रिस्त यांचा प्रेम आणि करुणा यांचा संदेश संपूर्ण मानव जातीला आजही प्रेरित करतो.
येशू ख्रिस्तांची शिकवण आपल्या जीवनात आचरणात आणून न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित समाजाची जडणघडण करण्यासाठी निर्धार करूया, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
राष्ट्रपतींचा हिंदीमधला संदेश पाहण्यासाठी इथे क्लिक करा
***
Jaydevi PS/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1784950)
आगंतुक पटल : 250