मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मत्स्य क्षेत्रासाठीच्या किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) वरच्या देशव्यापी मोहिमेवर मत्स्य खात्याने आयोजित केला वेबिनार

Posted On: 24 DEC 2021 6:54PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या, मत्स्य, पशुपालन आणि दुग्ध विकास मंत्रालयाच्या  मत्स्य विभागाने, मत्स्य क्षेत्रासाठीच्या किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) वरच्या देशव्यापी मोहिमेवर 23 डिसेंबर 2021 ला वेबिनार आयोजित केला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत या विभागाने 20.12. 2021 ते 26.12.2021 या काळात आयोजित केलेल्या विशेष सप्ताहाअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मत्स्य विभागचे सचिव जतींद्रनाथ स्वैन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विविध राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मत्स्य विभागाचे अधिकारी, कृषी, पशु वैद्यक आणि मत्स्य विद्यापीठांचे शाखा प्रमुख, राष्ट्रीय आणि सहकारी बँका, उद्योजक, वैज्ञानिक, शेतकरी, विद्यार्थी आणि देशभरातल्या जलचर विश्व उद्योगाशी संबंधित यांच्यासह 400 जण या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मत्स्यसंपदा क्षेत्राचे वैविध्य आणि पार्श्वभूमी याबाबत माहिती देताना मत्स्य विभाग सचिवांनी माहिती दिली. मत्स्य क्षेत्रात किसान क्रेडीट कार्ड सुविधा म्हणजे मच्छिमार आणि शेतकऱ्यांना, पुरेसा आणि वेळेवर पत पुरवठा करतखेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी मदतीचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. सर्व संबंधितांचा समावेश राहावा या दृष्टीने 15 नोव्हेंबर 2021 ते 15 फेब्रुवारी 2022 या काळात देशव्यापी मोहीम आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी सादरीकरणही करण्यात आले. त्यानंतर मत्स्यपालन करणारे शेतकरी, मच्छिमार, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे मत्स्य विभाग, राष्ट्रीय आणि सहकारी बँका, उद्योजक, वैज्ञानिक, शेतकरी, विद्यार्थी यांच्या समवेत खुली चर्चा झाली. केसीसी साठी वित्तीय पाठबळ, केसीसी प्रक्रियेसाठी ऑनलाईन पोर्टल, केसीसी संपर्कासाठी नोडल बिंदू, यासारखे मुद्दे आणि शंका उपस्थित करण्यात आल्या, यावेळी शंकासमाधान आणि उपस्थित मुद्याबाबत  स्पष्टीकरण देण्यात आले.

***

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1784946) Visitor Counter : 243


Read this release in: Telugu , Tamil , English , Urdu , Hindi