मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसी येथील रामनगरमधील दुग्ध उत्पादक सहकारी संघ प्रकल्पासाठी बायोगॅसआधारित वीज निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी केली

Posted On: 23 DEC 2021 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2021

पार्श्वभूमी

वाराणसी डेअरी संयंत्रमध्ये बायोगॅसवरील वीज  निर्मिती प्रकल्प बसवण्यात आला आहे. हा प्रकल्प 4000 घन मीटर/दिन क्षमता असलेल्या  बायोगैस संयंत्रमध्ये बायोगॅस निर्मितीसाठी सुमारे 100 मेट्रीक टनाचा वापर करेल. त्या बदल्यात इलेक्ट्रिकल आणि औष्णिक उर्जा निर्मितीसाठी बायोगॅस वापरण्यात येणार असून त्यामुळे या डेअरी प्रकल्पाची उर्जेची गरज भागेल. 

वाराणसी डेअरी प्रकल्पाच्या 10 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात 194 गावे आहेत. तेथे सुमारे 68.6 हजार गुरे (पशुधन  गणनेनुसार) असून त्यातून  दररोज सुमारे 779 टन  (सरासरी 11 किलोग्रॅम) शेण उपलब्ध होते 

या गावांमधील 18 गावे नमुन्यासाठी निवडून 1519 शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले गेले. साधारणपणे शेतकऱ्यांना 0.25 प्रतिकिलो दराने  शेण विकून पैसे मिळतात. सर्वसाधारणपणे 37 टक्के शेतकऱ्यांनी स्वतःहून नियमितपणे गुरांचे शेण विकण्याची तयारी दर्शवली.  डेअरीतील प्रकल्पांच्या अंदाजानुसार प्रकल्पापासून 10 किलोमीटर अंतरात प्रतिदिन 300 टन शेण उपलब्ध होण्याची आवश्यकता होती. वाराणसीतील बायोगॅस प्रकल्पाला प्रतिदिन 100 टन शेण जवळपासच्या 2000 शेतकऱ्यांकडून व आजूबाजूच्या गोशाळेतून उपलब्ध झाले.

आणंदमध्ये झकारियापुरा येथील खत व्यवस्थापन प्रकल्पातून शेतकऱ्यांना प्रतिकिलो  दीड ते दोन रुपये दराने पैसे देण्यात आले.  बायो सीएनजीसाठी गुरांचे शेण घेणाऱ्या बनास डेअरीकडून शेतकऱ्यांना 1 रुपये  प्रतिकिलो दराने पैसे अदा करण्यात आले.

प्रकल्पांची उर्जेची गरज गाईच्या शेणाने भागवणारा असा हा पहिलाच प्रकल्प आहे. वाराणसीचे शेतकरी  दुधाव्यतिरिक्त 1.5 रुपये ते 2 रुपये प्रतिकिलो दराने गुरांचे शेणविकून कामे करू शकतील. शेतकऱ्यांना विक्रीच्या वेळी  1 रु प्रतिकिलो दराने पैसे देण्यात येतील तर उर्वरित  पैसे सेंद्रिय खताच्या खरेदीवरील अनुदान म्हणून वळते करता येतील.

सुमारे 19 कोटी रुपयांचा प्रस्तावित खर्च असणारा या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रकल्पातल्या दुधाची 0.40 रु प्रतिलीटर इतकी  बचत होईल आणि प्रकल्पावरील खर्च सहा वर्षात भरून निघेल

 

 

 

 

 

S.Kane/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1784663) Visitor Counter : 156


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu