उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

निरक्षरतेचे निर्मुलन ही लोकचळवळ बनली पाहिजे – उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू


प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने किमान एका व्यक्तीला शिकवावे असे उपराष्ट्रपतींचे आवाहन, ‘नागरिकांची वैयक्तिक सामाजिक जबाबदारी’ असे केले नामाभिधान

उपराष्ट्पतींच्या हस्ते नेहरू व टागोर साक्षरता पारितोषिकांचे वितरण

Posted On: 19 DEC 2021 12:55PM by PIB Mumbai

 

खाजगी क्षेत्रासह सर्व क्षेत्रातील संबधितांनी पुढे येत प्रौढ साक्षरता व कौशल्य प्रशिक्षण यामधील सरकारच्या कामकाजात सहाय्यकारी व्हावं असे आवाहन उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी आज केलं. प्रत्येक प्रौढ व्यक्ती साक्षर होण्याच्या आवश्यकतेवर भर देत त्यांनी सर्वसामान्यांमध्ये डिजिटल साक्षरता आणि आर्थिक साक्षरता  यांच्या प्रसारावर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकताही व्यक्त केली.

उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज नवी दिल्लीत नेहरू व टागोर साक्षरता पुरस्कार या प्रतिष्ठित पुरस्कारांचे वितरण झाले. त्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती संबोधित करत होते. माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशन अश्यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करणाऱ्या भारतातील  अशिक्षितांची संख्या ही जगात सर्वाधिक असावी, ही निराश करणारी बाब आहे असे ही त्यांनी नमूद केले. हे आव्हान पेलण्यासाठी तातडीची पावले उचलली गेली पाहिजेत असे सांगत त्यांनी साक्षरता चळवळीला लोकचळवळ बनवण्याचे आवाहन केले.

प्रत्येक गावातील प्रत्येक वस्तीतील प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने पुढे येत किमान एका व्यक्तीला तरी लिहिणे वाचणे, डिजिटल उपकरणांचा वापर आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे याबद्दल शिक्षण देण्याचे मनावर घ्यावे, असे आवाहन करत त्यांनी या पुढाकाराला वैय्यक्तिक सामाजिक जबाबदारी असे म्हटले आहे .

प्रौढ साक्षरतेसाठी दिलेल्या बहुमुल्य योगदानाबद्दल पुरस्कारप्राप्त व्यक्तींची प्रशंसा करताना उपराष्ट्रपतींनी भारताला संपूर्ण साक्षर व शिक्षित राष्ट्र बनविण्याचा निर्धार करण्यास प्रत्येकाला सांगितले. नेहरु व टागोर साक्षरता पारितोषिके मिळवल्याबद्दल अभिनंदन करत उपराष्ट्रपतींनी आपण सर्वजण शिक्षित आणि समर्थ भारत हे दृश्य प्रत्यक्षात आणण्यासाठी काम कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

भारतीय प्रौढ शिक्षण संघटना (IAEA)  1966 या वर्षापासून नेहरू साक्षरता पारितोषिक तर 1987 या वर्षापासून टागोर साक्षरता पारितोषिके देत आहे.  शैक्षणिक क्षेत्र व राष्ट्रीय विकासाच्या कामात महत्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींची वा संस्थांची निवड या पारितोषिकांसाठी करण्यात येते.

प्रोफेसर पी आदिनारायण रेड्डी आणि प्रोफेसर एम सी रेडीप्पा यांना अनुक्रमे 20192020 या वर्षासाठीच्या  नेहरू साक्षरता पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तर अनिता दिघे व निशात फारुक यांना गेल्या दोन वर्षासाठीच्या  टागोर साक्षरता पारितोषिकाने गौरवण्यात आले होते.

उपराष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण खालील लिंकवर वाचता येईल.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1783209) Visitor Counter : 237