आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 137.46 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात लसीच्या 76 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.38%, मार्च 2020 पासूनचा सर्वाधिक दर

गेल्या 24 तासात 7,081 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या (83,913) 570 दिवसातली सर्वात कमी संख्या

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.61%) गेले 35 दिवस 1% पेक्षा कमी

Posted On: 19 DEC 2021 9:40AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 76,54,466 मात्रा देऊन , भारतातील कोविड-19 लसीकरण व्याप्तीने 137.46 कोटी (1,37,46,13,252) मात्रांचा टप्पा पार केला. 1,44,53,135 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे :

 

 

HCWs

1st Dose

1,03,86,235

2nd Dose

96,44,105

 

FLWs

1st Dose

1,83,83,946

2nd Dose

1,67,68,743

 

Age Group 18-44 years

1st Dose

48,64,15,997

2nd Dose

29,27,38,782

 

Age Group 45-59 years

1st Dose

19,14,81,462

2nd Dose

13,97,81,329

 

Over 60 years

1st Dose

11,96,51,542

2nd Dose

8,93,61,111

Total

1,37,46,13,252

 

गेल्या 24 तासांत 7,469 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,41,78,940 झाली आहे.

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.38% इतका आहे, जो मार्च 2020 पासून सर्वाधिक आहे.

केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या 52 दिवसांपासून दररोज 15,000 पेक्षा कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद होण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासात 7,081 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 83,913 असून ही 570 दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.24% आहे आणि हे प्रमाण मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 12,11,977 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 66.41 कोटींपेक्षा जास्त (66,41,09,365) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली जात असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.61% असून गेल्या 35 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.58% असून गेले सलग 76 दिवस हा दर 2 % पेक्षा कमी आणि गेले 111 दिवस 3% पेक्षा कमी राहिला आहे.

***

MaheshC/SeemaS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1783176) Visitor Counter : 204