इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठी भारत- व्हिएतनांम यांच्यात करार

Posted On: 16 DEC 2021 9:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2021

भारत  दौऱ्यावर आलेले व्हिएतनामचे माहिती आणि दळणवळण मंत्री गुएंग मन हंग यांनी आज नवी दिल्लीत, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयात जाऊन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये उभय देशांनी डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याबाबत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची चर्चा झाली. तसेच दोन्ही देशातील आयसीटी म्हणजेच, माहिती आणि दळणवळण व्यापार आणि सहकार्य अधिक वाढवण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली.

यावेळी दोन्ही मंत्रालयांमध्ये, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करण्याबद्दलच्या सामंजस्य करारालाही यावेळी मुदतवाढ देण्याचा करारही यावेळी करण्यात आला. या करारामुळेक्षमता बांधणीत वाढ करण्यासाठी खाजगी कंपन्या, सरकारे, संस्था यांच्यातील समन्वय आणि देवघेव वाढवणेतसेच दोन्ही देशातील आयसीटी क्षेत्राशी संबंधित, सार्वजनिक आणि खाजगी संस्थांमधील सहकार्य वाढवले जाणार आहे.

डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत, भारताने गेल्या 19 महिन्यांत, डिजिटलीकरणासाठी अत्यंत वेगाने प्रयत्न केले आहेत, जेणेकरुन कोविड संकटकाळातही या माध्यमातून डिजिटल व्यवहार सुरु राहतील, अशी माहिती राजीव चंद्रशेखर यांनी दिली. या महामारीच्या काळात , भारताचे माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्र, डिजिटल सरकारी उपक्रम आणि नव्याने उदयास येणाऱ्या तंत्रज्ञान-स्टार्ट अप्स यांनी नव्या आव्हानांचा सामना करण्यात जो चिवटपणा आणि परिपक्वता दाखवली, टो जगातल्या इतर विकसनशील आणि कमी विकसित राष्ट्रांसाठी एक आदर्शवत धडा होता, असेही चंद्रशेखर म्हणाले.

 

 

 

 

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1782451) Visitor Counter : 199


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu