PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
16 DEC 2021 8:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 16 डिसेंबर 2021




आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 60,12,425 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 135.25 कोटी मात्रांचा (1,35,25,36,986) टप्पा पार केला आहे. देशभरात 1,41,93,269 सत्रांच्या आयोजनातून हे लसीकरण करण्यात आले.
गेल्या 24 तासांत 7,948 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,41,54,879.झाली आहे. परिणामी, सध्या, भारतातील रोगमुक्ती दर 98.38 % असून मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर आहे.
केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 49 दिवस नव्या कोविड बाधितांची संख्या 15,000 हून कमी नोंदली जात आहे. गेल्या 24 तासांत 7,974 नव्या कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली.
देशातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 87,245. इतकी असून देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.25% आहे. मार्च 2020 पासून ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्या क्षमता विस्ताराचे काम सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 12,16,011 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 66 कोटी 2 लाखांहून अधिक (66,02,47,762) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.64% असून गेले 32 दिवस हा दर 1% हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 0.57 % आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 73 दिवस 2% हून कमी आहे आणि आता गेले सलग 108 दिवस हा दर 3 % हून कमी राहिला आहे.
इतर अपडेट्स :-
S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1782417)
आगंतुक पटल : 230