सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टार्ट-अप्ससाठी किमान अर्थसहाय्य योजना

Posted On: 16 DEC 2021 7:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2021

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची  सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पत हमी निधी योजनेच्या स्वरूपात एक योजना आहे जी छोटे  स्टार्ट-अप आणि नवीन उद्योगांसह सूक्ष्म आणि लघु क्षेत्रातील कर्जदारांना कर्ज देणाऱ्या संस्थांच्या कर्ज सुविधांसंदर्भात हमी देते.

नवीन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची स्थापना करण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाकडून कोणत्याही मंजुरीची आवश्यकता नाही. मंत्रालयाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि एमएसएमईंना मार्गदर्शक सहाय्य पुरवण्यासाठी मंत्रालयाची राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्षेत्रीय कार्यालये आहेत.

केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

S.Patil/S.kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1782375) Visitor Counter : 207


Read this release in: English , Urdu , Tamil , Telugu