संरक्षण मंत्रालय

पॅनेक्स -21: कार्यक्रमपूर्व प्रसिद्धीपत्रक

Posted On: 07 DEC 2021 3:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2021

नवी दिल्लीतील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या कोठारी सभागृह  येथे 07 डिसेंबर 2021 रोजी बिमस्टेक देशांच्या सदस्य राष्ट्रांसाठी मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव,पॅनेक्स-21  (PANEX-21) कार्यक्रमपूर्व प्रसिद्धी सोहळा आयोजित करण्यात आला. हा सराव 20 ते 22 डिसेंबर 21 या कालावधीत पुणे येथे आयोजित करण्यात आला असून त्यात भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड येथील विषय तज्ञ आणि प्रतिनिधींचा सहभाग असेल.

संरक्षण  राज्य मंत्री श्री अजय भट्ट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या भव्य कार्यक्रमाला बिमस्टेक चे सरचिटणीस श्री तेन्झिन लेकफेल, चीफ ऑफ डिफेन्स स्टॅफ जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार, चीफ ऑफ इंटग्रेटेड स्टाफ (सीआयएससी) एअर मार्शल बी. आर. कृष्णा आणि बिमस्टेक  राष्ट्रांचे उच्चायुक्त आणि राजदूत यांच्यासह नागरी आणि संरक्षण दलातले अनेक प्रतिष्ठित अतिथी उपस्थित होते.

लष्करप्रमुख  जनरल एम. एम.  नरवणे यांनी आपल्या सुरुवातीच्या भाषणात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सदस्य राष्ट्रांच्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले आणि भविष्यात महामारीसारख्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने, परस्पर आंतरराष्ट्रीय समन्वयासाठी यंत्रणा विकसित करण्यासाठी या संधीचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल बिपिन रावत यांनी ‘बिमस्टेक राष्ट्रांमधील संरक्षण सहकार्य ’ या विषयावरील भाषणात, सदस्य राष्ट्रांच्या सुरक्षा आणि न्यायिक संस्थांमधील  संरक्षण सहकार्य सुलभ करण्यासाठी समान कायदेशीर आराखडा  तयार करण्याचे आणि माहितीचे  आदानप्रदान करण्याच्या अनुषंगाने  यंत्रणा उभारण्याचे महत्त्व अधोरेखित केले

माननीय रक्षा राज्य मंत्री, श्री अजय भट्ट यांनी आपल्या भाषणादरम्यान, आपल्या  शेजारी प्रथम या धोरणाचा भाग म्हणून, बिमस्टेकला  भारताने दिलेल्या  महत्त्वाकडे उपस्थितांचे  लक्ष वेधले.आपत्तींच्या  संयुक्त प्रतिसादासाठी संसाधने एकत्रित करण्याच्या दृष्टीने, क्षमता विकास आणि प्रशिक्षण तसेच संस्थात्मक संस्थांच्या मदतीने  आपत्ती व्यवस्थापन तज्ञांचा प्रादेशिक पूल, यंत्रणा, नियम  आणि कायदेशीर आराखडा असलेली सर्वसमावेशक बिमस्टेक संरचना विकसित करणे आवाहन त्यांनी सदस्य राष्ट्रांना केले.

कार्यक्रमा दरम्यान श्री अजय भट्ट यांच्या हस्ते आगामी सरावाच्या स्मरणार्थ पोस्टरचे अनावरण करण्यात आले.या सरावादरम्यान  20 डिसेंबर ते 22 डिसेंबर 21 या कालावधीत पुणे येथे परिसंवाद, जमिनीवरील  सराव  आणि बहुसंस्था सरावाचे  आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

 

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1778809) Visitor Counter : 292